Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपद भाग्यश्री बानायत-धिवरे

September 2, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Bhagyashree Banayat Dhiware

मुक्तपीठ टीम

शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद भाग्यश्री बानायत-धिवरे यांच्या वर्णी लागले आहे. भाग्यश्री बानायत धिवरे रेशीम उद्योग विभागाच्या संचालक होत्या. कान्हुराज बगाटे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली. बगाटेंच्या नियुक्तीला आव्हान देण्यात आले होते. बगाटे थेट आयएएस नसल्याने त्यांची नेमणूक रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले होते. बगाटेंच्या बदलीनंतर शिर्डीत फटाके फोडण्यात आले आहे.

 

कोण आहेत भाग्यश्री बानायत?

  • भाग्यश्री बानायत मूळच्या नागपूर जिल्ह्यातील आहेत.
  • २०१२ च्या बॅचच्या त्या आयएएस अधिकारी आहेत.
  • सध्या त्या नागपूर येथे रेशीम उद्योग संचालनालयात संचालक म्हणून कार्यरत होत्या.
  • आयएएस झाल्यानंतर त्यांची नागालँड केडरमध्ये निवड झाली.
  • २०१८ मध्ये त्या प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात परतल्या आहेत.
  • महाराष्ट्रात परत आल्यानंतर रेशीम उद्योग संचालयानालयात कार्यरत असताना त्यांनी कोरोना काळात केलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली. त्यांना अनेक सन्मानही मिळाले आहेत.

 

बगाटेंच्या बदलीनंतर शिर्डीत फटाके फोडले

  • शिर्डीचे सध्याचे सीईओ बगाटे यांची नियुक्ती वादग्रस्त ठरली.
  • बगाटेंच्या बदलीनंतर शिर्डीत फटाके फोडण्यात आले आहे.
  • फटाके कोणी फोडले हे अद्याप समजले नसले तरी काही ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करत फटाके फोडले असल्याची चर्चा सुरू आहे.

कान्हूराज बगाटे यांची कारकिर्द

  • कान्हूराज बगाटे हे पदभार स्वीकारल्यापासूनच चर्चेत होते.
  • बगाटे यांनी आपल्या कारकिर्दीत पत्रकारांना अनेक बंधन टाकून नियमावली जाहीर केली.
  • तर ग्रामस्थ दर्शन प्रश्नावरही वाद निर्माण झाला होता.
  • बगाटे यांच्या कार्यकाळात काही दिवसांपूर्वी संस्थान तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश यांचे मंदिरात जाताना CCTV व्हायरल झाले होते.
  • या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
  • मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याने औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
  • त्यांची नेमणूक करताना ते थेट आयएएस नसल्यानं त्यांची नेमणूक रद्द करावी अशी याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
  • या याचिकेवर दोन दिवसांपूर्वी सुनावणी होऊन न्यायालयाने पोलिसांना नोटीस काढून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले.
  • त्यानंतर आज अचानक कान्हूराज बगाटे यांच्या जागेवर भाग्यश्री बानायत यांची नेमणूक राज्यसरकारने केली असून कान्हूराज बगाटे मात्र नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

Tags: Aurangabad High Courtbhagyashreebanayan dhiware'kanhuraj bagateShirdi Sai Sansthan Trustऔरंगाबाद उच्च न्यायालयकान्हुराज बगाटेभाग्यश्री बानायत-धिवरेशिर्डी साईबाबा संस्थान
Previous Post

आता न्यायालयाचंही ‘गो’प्रेम! गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची सूचना!

Next Post

कथित क्लीन चिटची प्रत अनिल देशमुखांना महाग पडली!

Next Post
Anil deshmukh

कथित क्लीन चिटची प्रत अनिल देशमुखांना महाग पडली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!