Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता न्यायालयाचंही ‘गो’प्रेम! गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची सूचना!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
cow

मुक्तपीठ टीम

आतापर्यंत गाय म्हटलं की हिंदुत्ववाद्यांकडेच पाहिले जात असे, आता मात्र न्यायालयीन वर्तुळातही ‘गो’प्रेम दिसत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मांडलेलं मत तसं दाखवणारंच आहे. न्यायाधीश शेखर कुमार यादव यांनी गाय ही भारताच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून, गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करा, असं मत स्पष्ट शब्दात मांडले आहे. गायीच्या कत्तलीचा आरोप असलेल्या जावेद या आरोपीचा जामीन फेटाळताना न्यायालयाने हे मत मांडले. गायीला जगण्याचा मूलभूत हक्क देण्यावरून न्यायालयाने महत्वाचे भाष्य केले आहे.

 

न्यायाधीशांचे ‘गो’प्रेम!

  • न्यायाधीश शेखर कुमार यादव यांनी जामीनावर निकाल देताना हे मत मांडले. सरकारने संसदेत एक विधेयक आणले पाहिजे.
  • त्यात गाईला मौलिक अधिकार द्यावे आणि राष्ट्रीय पशू म्हणून घोषित केले जावे.
  • उच्च न्यायालयाने आपल्या सूचनेत म्हटले आहे की, केंद्र सरकारने संसदेत विधेयक आणावे आणि गायीला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्यावा.
  • गाईचे कल्याण होईल तेव्हा देशाचे कल्याण होईल.
  • गाय ही भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.
  • संसदेने कोणताही कायदा केला तरी सरकारने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे.
  • गायीला नुकसान पोहोचवणाऱ्यांना शिक्षा देणारा कायदा तयार केला पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

 

न्यायमूर्ती शेखर कुमार यादवांचे सरळस्पष्ट मत

  • गोरक्षा केवळ एका धर्माचे काम नाही.
  • गाय ही या देशाची संस्कृती आहे आणि तिचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
  • तुम्ही कोणत्या धर्माचे आहात हे महत्त्वाचे नाही.

 

न्या. यादवांनी मांडलेले ११ महत्वाचे मुद्दे

  1. मूलभूत अधिकार केवळ गोमांस खाणाऱ्यांनाच नाही.
  2. जे गायींची पूजा करतात आणि आर्थिकदृष्ट्या गायींवर अवलंबून असतात त्यांनाही तसेच मूलभूत अधिकार आहेत.
  3. जगण्याचा हक्क मारण्याच्या अधिकारापेक्षा अधिक आहे.
  4. गोमांस खाण्याचा अधिकार हा कधीही मूलभूत अधिकार मानला जाऊ शकत नाही.
  5.  गाय म्हातारी आणि आजारी असतानाही त्यांचा उपयोग होतो.
  6. तिचे शेण आणि मूत्र शेती, औषधांसाठी खूप उपयुक्त आहे.
  7. केवळ हिंदूंनाच गायींचे महत्त्व समजले असे नाही. मुस्लिमांनीही गायीला भारताच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग मानले आहे.
  8. पाच मुस्लिम शासकांनी गायींच्या कत्तलीवर बंदी घातली. बाबर, हुमायून आणि अकबर यांनी त्यांच्या धार्मिक सणांमध्ये गायींच्या कुर्बानीवरही बंदी घातली.
  9. अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे गायी भुकेने आणि गोठ्यात रोगाने मरतात. पॉलिथीन खाल्ल्यानंतर तिचा मृत्यू होतो.
  10. संपूर्ण जगात भारत हा एकमेव देश आहे, जिथे विविध धर्माचे लोक राहतात, जे वेगवेगळ्या प्रकारे पूजा करतात, पण त्यांची विचारसरणी एकच आहे.
  11. जेव्हा गायींचे कल्याण होईल तेव्हा देशाचे कल्याण होईल

न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी हा निकाल देताना सांगितले की, सरकारने आता संसदेत विधेयक आणावे.


Tags: Allahabad High CourtCowअलाहाबाद उच्च न्यायालयगाय
Previous Post

बालिका वधू आणि बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन

Next Post

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपद भाग्यश्री बानायत-धिवरे

Next Post
Bhagyashree Banayat Dhiware

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपद भाग्यश्री बानायत-धिवरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!