Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखेर नारायण राणेंना अटक! केंद्रीय मंत्रीपदावर असताना अटक झालेले पहिले मराठी नेते!!

August 25, 2021
in featured, Trending, घडलं-बिघडलं
0
cabinet minister Rane

मुक्तपीठ टीम  

मोदी सरकारमधील सुक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांना सत्ता मिळताच वाट्टेल तसं बोलणं भोवलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असतानाच अशा प्रकारच्या प्रकरणात अटक झालेले नारायण राणे पहिले मराठी नेते ठरले आहेत.  त्यांची जन आशीर्वाद यात्रा प्रत्येक टप्प्यावर वादाच्या भोवऱ्यात सापडत होती. महाडमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली चढवली असती, असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. नाशिकमधील अशाच एका गुन्ह्यात त्यांना अटक करण्याचे आदेश निघाले. त्यामुळे राणेंसमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्रीपदावर असताना अशा गुन्ह्यासाठी अटक होऊन पोलीस कोठडीत जाणारे नारायण राणे हे पहिलेच मराठी नेते असावेत.

 

अद्याप त्यांना कोणत्या प्रकरणात अटक झाली ते स्पष्ट झालेले नसले तरी रत्नागिरी पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार त्यांना संगमेश्वरच्या स्थानिक न्यायालयात हजर करून ट्रांसफर वॉरंटसह नाशिकला पाठवण्यात येण्याची शक्यता आहे.

 

राणेंना नेमकं काय भोवलं?

  • केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोलताना पुन्हा एकदा नको ते बोलून गेले.
  • नारायण राणे सध्या कोकणच्या दौऱ्यावर जनआशीर्वाद यात्रेसाठी आहेत.
  • त्याच वेळेस महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणेंचा तोल गेला.
  • त्यांनी स्वत:चं पद आणि उद्धव ठाकरेंचं पद विसरत वाट्टेल ते बोलले.

राणे काय बोललेत?

  • त्यांचे अॅडव्हाईजर कोण, त्यांनाच काही कळत नाही.
  • ते काय आम्हाला अॅडव्हाईज करणार?
  • ते काय डॉक्टर आहेत का?
  • तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना?
  • आणि ती पण लहान मुलांना?
  • अपशकुनासारखं बोलू नको म्हणाव.
  • त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का?
  • बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणावं.
  • त्या दिवशी नाय का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय?
  • मी असतो तर कानाखालीच चढवली असती.
  • हे काय देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी?
  • सरकार कोण चालवतंय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही.
  • राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे

 

राणेंविरोधात गुन्हे दाखल

  • शिवसेनेचे नाशिकमधील शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे.
  • त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत अटकेचे आदेश दण्यात आले आहेत. महाडमध्येही नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • महाडमध्येही युवासेना अधिकारी सिद्धेश पाटेकर यांनी फिर्याद दिली असून महाड शहर पोलीस ठाण्यात नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • महाड शहराचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस या प्रकरणी तपास करत आहेत. याशिवाय भाजपा कार्यकर्त्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि करोना प्रतिबंधक कायद्यार्तगत स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे.

 

राणेंच्या आक्षेर्पाह वक्तव्यानंतर शिवसैनिक पेटले, ‘कोंबडी चोर, मेंटल हॉस्पिटल’पासून वाट्टेल ती लाखोली!


Tags: cm uddhav thackerayMahadNarayan raneजन आशीर्वाद यात्रानारायण राणेमहाडमुख्यमंत्री उद्धव ठाकरेरत्नागिरी पोलीस
Previous Post

“कोणती शिवसेना? मी काय साधा माणूस वाटलो काय?”

Next Post

“महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल करण्याचा भाजपाचा कुटील डाव!”: नाना पटोले

Next Post
nana patole

"महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल करण्याचा भाजपाचा कुटील डाव!": नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!