Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल करण्याचा भाजपाचा कुटील डाव!”: नाना पटोले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचे नारायण राणेंचे वक्तव्य निषेधार्ह

August 24, 2021
in घडलं-बिघडलं
0
nana patole

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. भारतीय जनता पक्ष राणेंच्या खांद्यावर बंदुक ठेवून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल करण्याचा त्यांचा कुटील डाव आहे परंतु यात भाजपाला यश येणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

 

यांसदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवली असती’ हे नारायण राणे यांचे वक्तव्य अशोभनीय आहे. त्यांचा आम्ही निषेध करतो. नारायण राणे हे वारंवार मुख्यमंत्र्यांचा ऐकरी उल्लेख करतात, मुख्यमंत्रीपदाचा मान राखला पाहिजे.

 

जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारमधील राज्यातील मंत्री केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती देण्याऐवजी विरोधी पक्षांच्या नेत्यांबद्दल अपशब्द वापरण्याचे काम करत आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते तर आता दुसरे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहेत, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. विरोधी पक्षांबदद्ल राजकीय मतभेद असतात ते वैचारिक पातळीवरचे असतात. विरोधक म्हणजे शत्रू नाहीत हे भाजपाला समजले पाहिजे.

केंद्र सरकारने सात वर्षात कोणतेही काम केले नाही. त्यांच्याकडे जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही त्यामुळेच अशी बेताल वक्तव्ये करून मुळ मुद्द्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे काम केले जात आहे. मोदी सरकारने ७ वर्षात काय केले हे जनतेला सांगावे परंतु तसे न करता लोकांची दिशाभूल करण्याचे काम भाजपाचे हे मंत्री करत आहेत. नारायणे राणे यांच्या वक्तव्याबद्दल पोलीसांमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. पोलीस कायद्याप्रमाणे त्यांचे काम करतील, राज्यातील जनतेने मात्र भाजपाचा हा कुटील हेतू ओळखावा व राज्यातील शांततेला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही पटोले यांनी केले आहे.


Tags: BJPchief minister uddhav thackerayCongressnana patoleNarayan raneprime minister narendra modiनाना पटोलेपश्चिम बंगालमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

अखेर नारायण राणेंना अटक! केंद्रीय मंत्रीपदावर असताना अटक झालेले पहिले मराठी नेते!!

Next Post

राणेंच्या अटकेमागे राजकीय सूडबुद्धी! पोलिसांच्या खांद्यावर बंदूक!!

Next Post
pravin darekar & rane

राणेंच्या अटकेमागे राजकीय सूडबुद्धी! पोलिसांच्या खांद्यावर बंदूक!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!