मुक्तपीठ टीम
शुक्रवारी नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा मूक आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी मराठा आरक्षणावरून खासदार संभाजी छत्रपती आक्रमक झाल्याचे दिसले. यावेळी त्यांनी संसदेत घटना दुरुस्तीवर बोलण्यासाठी संधी देण्यात आली नसती तर त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो, असा गौप्यस्फोट केला. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठीचे पर्यायही सुचवले.
नांदेड मध्ये आज मराठा मूक आंदोलनाला हजारो संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
कोवीड सारखी महामारी असताना सुध्दा लोक समाजाच्या प्रश्नांसाठी एकत्रित येत आहेत.
समाजामध्ये असलेली खदखद यातूनच व्यक्त होते.#मराठा_आरक्षण #नांदेड pic.twitter.com/Ib0BKtCLVF
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 20, 2021
काय म्हणाले संभाजी छत्रपती
- संभाजी छत्रपतींनी यावेळी शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या कार्याचे दाखले दिले.
- त्यांनी स्वराज्याचा नेमका अर्थ समजावून सांगितला.
- स्वराज्य हे अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांचं असल्याचं त्यांनी सांगितलं.
- मला समाजाची भावना मांडायची आहे.
- त्यामुळे मला संसदेत बोलण्याची परवानगी द्या, अशी मागणी मी केली होती.
- पण मला बोलायला परवानगी दिली नाही.
- त्यामुळे कोणतीही गोष्ट भांडल्याशिवाय मिळत नाही हे माझ्या लक्षात आलं.
- आपल्यामागे संपूर्ण मराठा समाज आहे.
- आपल्याला शिवशाहूंचा वारसा लाभला आहे.
- पण मग काही खासदारांनीही पाठिंबा दिला आणि मग मला बोलायची संधी मिळाली.
- त्या खासदारांचेही मी आभार मानतो.
- मराठा आरक्षणाची जबाबदारी नांदेडच्या सुपुत्राने घ्यावी.
- पण ते कुठे आहेत? इथेही ते आलेले नाहीत.
- ते जेव्हा दिल्लीमध्ये आले होते, तेव्हा सगळ्यांना भेटले.
- काँग्रेसच्या नेत्यांनाही भेटले पण मला भेटले नाहीत.
- संभाजी छत्रपतींना भेटायला त्यांना वेळ नव्हता.
- पण समाजाला दिशाहीन करुन चालणार नाही.