मुक्तपीठ टीम
तालिबाननं अफगाणिस्तानावर ताबा मिळविल्यानंतर तिथली परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. जगातील विविध देशांनी तिथे असणारे आपले नागरिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारने तेथून भारतीय नागरिकांना सुरक्षित देशात परत आणण्यास सुरुवात केली आहे. यासाठी भारत सरकारने हवाई दलाची मदत घेतली आहे. भारतीय हवाई दलाच्या सी-१७ विमानातून १२० भारतीय नागरिकांना घेऊन काबूल येथून विमान मंगळवारी सकाळी भारतात आले. गुजरातमधील जामनगर विमानतळावर हे विमान उतरलं.
जाणून घेऊया भारतीय हवाई दलाचे सी-१७ विमान आहे तरी कसं…
सर्वात मोठ्या मालवाहू महाविमानांपैकी एक!
- जगातील सर्वात मोठ्या मालवाहू जहाजांपैकी एक, बोईंग सी -१७ ग्लोबमास्टर विमान चार इंजिनांनी सुसज्ज आहे.
- हे कारगिल, लडाख आणि देशातील इतर कठीण ठिकाणी सहज उतरू शकते.
- बोईंग सी -१७ ग्लोबमास्टरच्या एका उड्डाणामध्ये ७५ टन सामान वाहून नेण्याची क्षमता आहे.
- ३५०० फूट लांब धावपट्टीवर उतरण्याची क्षमता
- लँडिंगमध्ये अडचण आल्यास रिव्हर्स गिअरच्या साहाय्याने ते परत नेले जाऊ शकते.
बहुउपयोगी महाक्षमतेचे महाविमान!
- १७४ फूट लांब असलेल्या विमानात एकावेळी १५० हून अधिक जवान बसू शकतात.
- ४२ हजार किमी पर्यंत उड्डाण करण्याची क्षमता, या विमानात तीन हेलिकॉप्टर किंवा दोन ट्रक एअरलिफ्ट करण्याची क्षमता आहे.
- आणीबाणीच्या वेळी, सी -१७ ग्लोबमास्टर विमानात ५०-१०० बेडची वातानुकूलित सुविधा असते, जी रुग्णांच्या उपचारांसाठी उपयोगी ठरते.
एअर लिफ्टसाठी उपयोगी महाविमान
- बोईंग कंपनी सी -१७ ग्लोबमास्टरची निर्मिती करते.
- सी-१७ ग्लोबमास्टर या महाकाय विमानांमुळे भारताचे हवाई बळ वाढले आहे.
- भारताच्या वर्तमान आणि भविष्यातील सामरिक हवाई वाहतूक आवश्यकता पूर्ण करण्याची क्षमता वाढली आहे.
- संकटाच्या काळात कुठूनही एअर लिफ्ट करण्याची आवश्यकता भासली तर सी-१७ ग्लोबमास्टर उपयोगी आहे.
- अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधून भारतीयांना देशात आणण्यासाठी हेच विमान वापरले जात आहे.