मुक्तपीठ टीम
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीच्या शोधात असलेल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एएआयकडून सीनियर असिस्टंट या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण २९ पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
शैक्षणिक पात्रता
- सीनियर असिस्टंट ऑपरेशनसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा आणि त्याच्याकडे एलएमव्ही प्रकारातील लायसन्स असावे. त्यासोबतच त्याचा डिप्लोमा इन मॅनेजमेंट हा कोर्स झालेला असणे आवश्यक आहे.
- सीनियर असिस्टंट वित्त या पदासाठी उमेदवार हा बी.कॉम. असावा. त्याचा संगणकाचा तीन ते सहा महिन्याचा प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे.
- सीनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स या पदावर अर्ज करणारा उमेदवार हा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, रेडिओ इंजिनिअरिंग मधील उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५० वर्षापर्यंत निश्चित करण्यात आले आहे.
पगार
- सीनियर असिस्टंट ऑपरेशन्स : ३६ हजार ते १ लाख १० हजार
- सीनियर असिस्टंट वित्त : ३६ हजार ते १ लाख १० हजार
- सीनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स : ३६ हजार ते १ लाख १० हजार
अधिक माहितीसाठी
एएआयच्या अधिकृत वेबसाइट aai.aero वरून माहिती मिळवू शकता.