मुक्तपीठ टीम
कर्जवसुली आणि बदलीसाठी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजात बोलून फसवणुकीचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातून या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. विकास गुरव आणि किरण काकडे अशी या आरोपींची नाव आहेत. शरद पवारांच्या आवजात मंत्रालयात आलेल्या फोनवरून आणि चाकणमध्ये घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
आवाज तर आवाज नंबरही तोच कसा?
- एखाद्या व्यक्तीचा हुबेहुब आवाज काढणं अनेकांना जमतं.
- मिमिक्री करणारे कलाकार असे अनेकांचे आवाज काढतात.
- मनोरंजनाच्या चांगल्या उद्देशाने त्याचा वापर करतात.
- काही लोक त्या कौशल्याचा गैरवापर करतात.
- पण या प्रकरणातील आरोपींनी केवळ आवाजच काढला नाही तर नंबरही शरद पवार यांच्या वापरातील असल्याचे भासवले.
- त्यासाठी त्यांनी इंटरनेटवर उपलब्ध काही बेकायदा सेवांचा वापर केला असावा.
- अशा सेवा पुरवणाऱ्या वेबसाइटवर शुल्क भरून कोणालाही कॉल करताना आपल्याला जो नंबर समोरच्याला दिसला पाहिजे तो दाखवता येतो.
- या आरोपींनी शरद पवार यांच्या नावाने भामटेगिरी करताना हीच क्लुप्ती वापरली असण्याची शक्यता आहे.
आवाजाचं नकल कौशल्य आणि तंत्रज्ञानाच्या फसवणुकीपासून कसे वाचाल?
- मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे ही भामटेगिरी उघड झाली.
- शरद पवार हे कोणाच्या बदलीसाठी मुख्यमंत्री कार्यालयात फोन करणार नाहीत, ते दिल्लीत आहेत, त्यामुळे मुंबईच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरून कॉल करूच शकत नाही, हे लक्षात घेत अधिकाऱ्यांनी सावधगिरी बाळगली.
- त्यांनी शरद पवारांच्या बंगल्यावर फोन करून खात्री केली, तेव्हा तेथून फोनच केला नसल्याचे उघड झाले.
- आवाज नकलेचे कौशल्य आणि तंत्रज्ञान यांचा गैरवापर करून कोणीही कोणाला फसवू शकतं. त्यामुळे कधीही अशा संशयास्पद कॉलला बळी पडू नका.
- कोणाच्याही नावाने असे कॉल आले तर संबंधित व्यक्तीकडे पडताळणी करा.
शरद पवारांचा आवाज काढून फसवणूक! पुण्याच्या भामट्यांचा बदली आणि कर्जवसुलीचा प्रयत्न!