मुक्तपीठ टीम
एखादी वस्तू खरेदी करताना किंवा नोकरीच्या शोधात असताना सर्रासपणे आपला मोबाईल नंबर हा इंटरनेटवर टाकला जातो. टेलिमार्केटिंग कंपन्या हेच नंबर एकत्र करुन सतत कॉल करत असतात. मात्र यामुळे अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. यातून सुटका हवी असेल तर वापरा खाली नमूद केलेल्या सोप्या ट्रिक्स जेणेकरुन तुमची स्पॅम कॉलपासून सुटका होईल.
पहिली ट्रिक
- फ्लाईट मोड एक्टिवेट न करता इनकमिंग कॉलला थांबवण्यासाठी स्मार्टफोनच्या कॉल सेटिंगमध्ये जा. त्यात कॉल फॉरवर्डिंग ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला ३ ऑप्शन्स दिसतील.
- त्यात पहिला ऑल्वेज फॉरवर्ड, दुसरा फॉरवर्ड व्हेन बिझी आणि तिसरा फॉरवर्ड व्हेन अनआनसर्ड आहे.
- यानंतर ऑल्वेज फॉरवर्डचा पर्याय निवडा, त्यात स्पॅम नंबरला त्या मोबाईल नंबरवर फॉरवर्ड करा जो बंद आहे.
- आता अनेबल बटनवर टॅप करा.
- हे केल्याने तुम्हाला येणारे स्पॅम कॉल बंद होतील.
दुसरी ट्रिक
- मोबाईलच्या फोन ॲपला ओपन करा.
- रिसेंट कॉल्स ऑप्शनवर जा.
- कॉल लिस्टमध्ये त्या नंबरला निवडा ज्याला तुम्हाला स्पॅम मार्क करायचे असेल.
- यानंतर ब्लॉक/ रिपोर्ट स्पॅम पर्यायवर टॅप करा. नंतर स्पॅम नंबर ब्लॉक होईल आणि भविष्यामध्ये त्या नंबरवरून तुम्हाला कधीच कॉल येणार नाही.
तिसरी ट्रिक
- तुम्ही एक कॉल करून सुद्धा फोनवर येणारे स्पॅम कॉलला ब्लॉक करू शकता.
- स्पॅम कॉल करण्यासाठी तुमच्या फोनवरु १९०९ वर कॉल करा.
यानंतर फोनवर मिळणाऱ्या निर्देशांचे पालन करा आणि डू नॉट डिस्टर्बला ऍक्टिव करा.