मुक्तपीठ टीम
देशात बालविवाह करणं हा गुन्हा असूनही बालविवाहाच्या घटना अधूनमधून घडत आहे. अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. चक्क आईनेच पैशाच्या मोहापोटी आपल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचं लग्न ४५ वर्षाच्या माणसाशी लावून दिलं. हे प्रकरण भेलूपूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून भेलूपूर पोलिसांनी आई आणि तिचा पती लोकेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलीला एका स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तिला यापुढे तिच्या पती आणि आईसोबत राहण्याची इच्छा नाही आहे.
नेमकं प्रकरण काय?
- या अल्पवयीन मुलीचे आई-वडिल एका साडीच्या दुकानात काम करतात.
- ६ जून रोजी तिच्या आईने तिचे जबरदस्ती लग्न लावून दिले.
- तिचे आता वय हे १५ वर्ष आहे.
- तिचे लग्न राजस्थानमधील अलवर येथील रहिवासी लोकेश पंडित याच्याशी लावले.
- लोकेश पंडितचे वय ४५ वर्षे आहे.
- लग्नानंतरही ती जायला तयार नव्हती पण आईने तिला जबरदस्तीने पाठवले.
- तिच्या वडीलांना कॅन्सर आहे आणि ते अलीगढमध्ये राहतात.
- अलीकडेच तिचा पती तिला घेऊन वाराणसीत एका कार्यक्रमासाठी आला होता.
- तेव्हा वाराणसीच्या कँट रेल्वे स्थानकावर येताच ती मुलगी पळाली.
- आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने चाइल्ड लाइन तिथे पोहोचली.
- यानंतर तिला बालकल्याण समितीसमोर सादर करण्यात आले.
- त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
- बालकल्याण समितीच्या अध्यक्षांनी सांगितले की तिला आईऐवजी वडिलांसोबत राहायचे आहे.
- आई तिला पुन्हा राजस्थानला पाठवेल.
- तिला एका स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.