मुक्तपीठ टीम
पंतप्रधान जनधन योजनेचा लाभ झालेल्यांची संख्या ४१ कोटीहून अधिक झाली आहे. अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार ६ जानेवारी २०२१ पर्यंत या योजनेंतर्गत जनधन खात्यांची संख्या वाढून ४१ कोटी ६ लाख झाली आहे. तर झीरो बॅलेन्स असलेल्या खात्यांची संख्या कमी झाली आहे.
२०१५ पासून झीरो बॅलेन्स असलेल्या खात्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मार्च २०१५ मध्ये ५८% खाती अशी होती ज्यात काहीच रक्कम जमा नव्हती. परंतु अशा रक्कम जमा नसलेल्या खात्यांची संख्या अवघ्या साडेसात टक्क्यांवर वर आली आहेत.
कोरोनाच्या काळात जनधन बँक खाती वाढली
स्टेट बँक ऑफ इंडियाने ऑक्टोबरमध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार कोरोनाच्या काळात जनधन खाते उघडण्याच्या दरात ६०% वाढ झाली आहे. १ एप्रिल ते १४ ऑक्टोबर दरम्यान जवळपास ३ कोटी नवीन खाती उघडली गेली आहेत आणि ठेवी ११,६०० कोटींच्या जवळपास आहेत.
पंतप्रधान जनधन योजना ऑगस्ट २०१४ मध्ये सुरू केली गेली. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबातून खाते उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या खात्यात १०,००० रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध आहे.
जनधन खातेधारकांना मिळतात या अनेक सुविधा
- जनधन योजनेंतर्गत १० वर्षाखालील मुलांचे खातेदेखील उघडता येते.
- या योजनेंतर्गत खाते उघडल्यावर तुम्हाला रुपे एटीएम कार्ड, २ लाख रुपये अपघात विमा संरक्षण, ३० हजार रुपयांचे लाइफ कव्हर आणि ठेवीच्या रकमेवर व्याज मिळेल.
- १० हजारांची ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील मिळते.
- हे खाते कोणत्याही बँकेत उघडता येते. यामध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची गरज नाही.
पाहा व्हिडीओ: