मुक्तपीठ टीम
भामटे लुबाडण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधतात. त्यामुळे आपण रोजच्या जीवनात वावरताना दक्षता घेतलीच पाहिजे. आता फसवणुकीचा नवा प्रकार पुण्यात समोर आला आहे. पुण्यात ६५ वर्षीय महिला वकिलाचे सिम कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने साडे पाच लाख रुपये लुबाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वकिलाने यासंदर्भात डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. त्यामुळे आता सिमकार्ड अपडेट करायचे असेल तर खूपच काळजी घ्या.
पुणेरी भामटा, कसा दिला वकिलांना फटका?
- निरीक्षक संजय मोगले यांनी यांसदर्भात माहिती देताना सांगितले की,९ जून रोजी महिला वकिलाला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला.
- जो तिच्याशी मोबाइल ऑपरेटरचा कस्टमर केअरचा कार्यकारी म्हणून बोलला.
- “त्या व्यक्तीने पीडितेला सांगितले की कंपनी लवकरच तिच्या सिम कार्डवरील सेवा बंद करणार आहे, त्यामुळे वेळेपूर्वी ते अपडेट करा.”
- त्या व्यक्तीने पीडितेला सांगितले की, सिम अपडेट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तिला NEFT द्वारे तिच्या बँक खात्यात १ रुपये वर्ग करावी लागेल.
- महिलेने ही रक्कम बँक खात्यात वर्ग केली.
- पोलिसांनी सांगितले की, त्या व्यक्तीने पीडितेला बँक तपशील विचारला आणि खात्यातून साडे पाच लाख रुपये काढले.
- या प्रकरणी आयटी कायद्यातील तरतुदींनुसार आयपीसीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.