मुक्तपीठ टीम
भारतात अनेक परवडणारे फोन बाजारात आणल्यानंतर स्मार्टफोन निर्माता लाव्हा आता आपला पहिला 5G फोन देशात सादर करण्यास तयार आहे. दिवाळीच्या वेळी हा 5G लावा फोन येईल. कंपनीच्या प्रॉडक्ट हेड तेजिंदर सिंग यांनी ही माहिती दिली आहे. लाव्हा दिवाळीआधी पहिला 5जी स्मार्टफोन बाजारात आणण्याची योजना आखत आहे. ज्यात एक नवीन तंत्रज्ञान असणार आहे जे अद्वितीय असेल आणि आपल्याला इतर कोणत्याही डिव्हाइसमध्ये आढळणार नाही.
लाव्हाचा लवकरच स्मार्टवॉच
- लाव्हा ५जी फोन जबरदस्त फीचर्ससह येत आहे.
- त्याची किंमत १७,००० ते २०,००० रुपयांदरम्यान असेल.
- लाव्हा मोबाईल सेवा ऑपरेटरांशी चर्चा करून त्यांच्यासह बाजारात येण्याच्या तयारीत असण्याची चर्चा आहे.
- लाव्हा स्मार्टवॉचवरही काम करत आहे.
- या वर्षाच्या शेवटी दिवाळीच्या आसपास त्याचे अनावरण होईल.
- कंपनीचे येत्या काही दिवसांत स्मार्टफोन स्पेसमध्ये १० टक्के मार्केट शेअरचे लक्ष्य आहे.
- देशातील फीचर फोन प्रकारात यापूर्वीच कंपनीचा बाजारात २० टक्के हिस्सा आहे.
लाव्हाचा मोबाईल व्यवसाय वाढवण्याची स्मार्ट योजना
- लॅटिन अमेरिका, दक्षिणपूर्व आशियाई प्रदेश आणि आफ्रिका या देशांसह २० बाहेरील देशांमध्ये प्रवेश करण्याची योजना आहे.
- लाव्हा आधीच २० हून अधिक देशांमध्ये काम करत आहे.
- आता लावा काही आग्नेय आशियाई देशांमध्ये, काही आफ्रिकन देशांमध्ये आणि लॅटिन अमेरिकेत प्रवेश करत आहे.
- लाव्हाने अद्याप सध्या ५ जी फोन किंवा स्मार्टवॉचचे कोणतेही हार्डवेअर तपशील उघड केलेले नाहीत.
- या किंमतीतील रेंजमधील बजेट ५जी स्मार्टफोन असल्याने फोन मीडियाटेक डायमेन्सिटी किंवा स्नॅपड्रॅगन ४८० चिपसेटसह येऊ शकेल.