मुक्तपीठ टीम
अॅमेझॉन, झोमाटो आणि पेटीएमसह जगभरातील २९ हजार वेबसाईट गुरुवारी काही काळ ठप्प झाल्या होत्या. या कंपन्यांच्या वेबसाईट्स काही काळ काम करत नव्हत्या. यामध्ये अनेक विमान कंपन्या, बँका आणि टेक कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय सोनी लिव्ह, हॉटस्टारसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे अॅप्सही अचानक गुरुवारी संध्याकाळी डाऊन झाले होते.
आउटेज ट्रॅकिंग वेबसाईट डाउनडेटेक्टरच्या मते, डोमेन नेम सिस्टम (डीएनएस) मध्ये बिघाड झाल्यामुळे या वेबसाईट काही वेळासाठी ठप्प होत्या. मात्र, आता वेबसाईट्स सुरळीत सुरु आहेत. आउटेजमुळे या कंपन्यांच्या वेबसाईट लोड घेत नव्हत्या. सिस्टीम डोमेन नेम सिस्टीम सर्व्हिसमध्ये एररची माहिती दिली जात होती.
क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हाईडर कंपनी अकामाई टेक्नोलॉजीज (एकेम.ओ) ने सांगितले की, आम्ही एज डीएनएस सेवेच्या समस्यांकडे पाहात आहोत. याची तपासणी केली जात आहे.
अमेरिकन कंपन्यांवर परिणाम
डीएनएस काम करत नसल्याने अमेरिकेतील बड्या कंपन्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. यात डेल्टा एअर लाइन्स (डीएएल.एन), कोस्टको होलसेल कॉर्पोरेशन (सीओएसटीओ) आणि अमेरिकन एक्सप्रेस (एएक्सपी.एन) यासह अनेक एअरलाईन्स, बँकिंग आणि आयटी कंपन्यांचा समावेश आहे.
दोन महिन्यातली तिसरी घटना
- जूनमध्ये जगभरात सोशल मीडिया, सरकार आणि न्यूज वेबसाईटवर आउटेज हिट झालं होतं.
- केवळ २ महिन्यांच्या कालावधीत वेबसाईट्स ठप्प होण्याची ही तिसरी घटना आहे.
- अहवालात असे सांगितले गेले होते की, अमेरिकन क्लाउड कंप्युटिंग कंपन्यांच्या सर्व्हिसमधल्या बिघाडामुळे डीएनएस यंत्रणा खराब झाली. यानंतर २९ हजार कंपन्यांच्या वेबसाइट्स ठप्प पडल्या.