मुक्तपीठ टीम
महागडा स्मार्टफोन विकत घेताना आपण सर्वच त्याचे इतर फिचर्स पाहताना त्याचं बाह्य रुप म्हणजे लूकही पाहतोच पाहतो. पण घडतं काय, एकदा घेतली की त्याची काच फुटेल, बॉडीला ओरखडे पडतील, या भीतीनं तो कव्हरच्या बुरख्याआड दडतो. स्मार्टफोन यूजर्सची हीच अडचण ओळखून नोकिया आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहे. हा स्मार्टफोन एवढा सुपर स्ट्राँग असेल की त्याला कव्हरची गरजच भासणार नाही, असा कंपनीचा दावा आहे.
नोकिया मोबाइलने नुकताच आपल्या ट्विटर अकाउंटवर या फोनचा टीझर पोस्ट केला आहे. नोकियाचा नवीन फोन २७ जुलैला लॉन्च होणार आहे. टीझरमध्ये असा दावा केला गेला आहे की, स्मार्टफोन इतका मजबूत असेल की, या फोनला फोन कव्हरची गरजच भासणार नाही. नोकिया मोबाईलच्या टीझरमध्ये स्मार्टफोनच्या मागच्या बाजूस एक मेसेज दिला आहे. त्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘आमच्या नवीन नोकिया फोनसाठी तुम्हाला कव्हरची गरज भासणार नाही.’
सुपर स्टाँग स्मार्टफोनचे अनोखे फीचर्स
१. हा स्मार्टफोन २ कलर ऑप्शन्समध्ये येण्याची शक्यता आहे.
२. नवीन स्मार्टफोन नोकिया एक्सआर२० असू शकेल.
३. नोकिया एक्स२० चा रग्ड व्हर्जन असेल.
४. नोकिया एक्सआर२० ला यापूर्वी गीकबेंचवर स्पॉट केले आहे.
५. यातून अशी माहिती मिळाली की, हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ४८० ५जी प्रोसेसरद्वारे चालविला जाईल.
६. नोकिया एक्सआर २० स्मार्टफोन ब्लू आणि ग्रे कलर ऑप्शन्समध्ये येईल.
७. फोनच्या मागील बाजूस ४ कॅमेरे असू शकतात.
या स्मार्ट फोनचे इतर फिचर्स कोणते?
- नोकियाच्या २७ जुलैला लॉन्च होणार्या या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले असू शकतो.
- टीझर प्रतिमेत असे सुचवले आहे की, फोनच्या मागच्या बाजूला क्वाड कॅमेरा सेटअप असू शकतो.
- फोनच्या मागील बाजूस मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सेलचा असू शकतो. नोकिया पॉवर युझरने दिलेल्या माहितीनुसार, फोनच्या पुढील बाजूस मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा असू शकतो.
- हा नोकिया फोन अँड्रॉइड ११ ऑपरेटिंग सिस्टमसह येऊ शकतो. फोनमध्ये ४,६३० एमएएच बॅटरी असू शकते.
- सुरक्षेसाठी फोनमध्ये फेस आयडी आणि फिंगरप्रिंट स्कॅनरचेही ऑपशन दिले जाऊ शकतात.