मुक्तपीठ टीम
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आरोग्य सेवा प्रणालीवरील ओझे कमी करण्यासाठी आणि रूग्णांना उत्तम उपचार व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी गोरेगावच्या श्री साई क्लिनिक आणि पार्वतीबाई शंकरराव चव्हाण रूग्णालयात पीएसए ऑक्टिजन निर्मिती प्लांट प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कोरोना एन्टीबॉडी चाचण्या, आयजीजी, आणि आयजीएम चाचण्यांसह अनेक विशेष चाचण्याचा समावेश आहे. या चाचण्या रुग्णालयाने उपलब्ध करुन दिल्या आहेत. या चाचण्याचा अहवाल अवघ्या २ ते ४ तासात उपलब्ध होईल.
हवेतून कसा बनवतात शुद्ध ऑक्सिजन?
• हवेत आधीच प्राणवायू अर्थात ऑक्सिजन असताना पुन्हा तो शोषून नव्याने प्राणवायू कसा तयार केला जातो, याचे कुतूहल असणे स्वाभाविक आहे.
• वातावरणातील हवा शोषून, पी.एस.ए. (pressure swing adsorption) तंत्राचा वापर करुन रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करताना, सर्वप्रथम संयंत्रांमध्ये योग्य दाबाने हवा संकलित (कॉम्प्रेस) केली जाते.
• त्यानंतर ती हवा शुद्ध (फिल्टर) करण्यात येते.
• त्यामुळे हवेतील अशुद्ध घटक जसे की, धूळ, तेल/इंधन यांचे अतिसूक्ष्म कण, इतर अयोग्य घटक गाळून वेगळे केले जातात.
• या प्रक्रियेनंतर उपलब्ध झालेली शुद्ध हवा ‘ऑक्सिजन जनरेटर’मध्ये संकलित केली जाते. ऑक्सिजन जनरेटरमध्ये असलेल्या झिओलीट (Zeolit) या रसायनयुक्त मिश्रणाद्वारे या शुद्ध हवेतून नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही वायू वेगळे केले जातात.
• वेगळा करण्यात आलेला ऑक्सिजन अर्थात प्राणवायू हा योग्य दाबासह स्वतंत्रपणे साठवला जातो. तेथून तो पाईपद्वारे रुग्णांपर्यंत पोहोचवला जातो.
या कार्यक्रमाप्रसंगी आमदार कपिल पाटील, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, सचिन चव्हाण, युवराज मोहिते, समीर देसाई आदी मान्यवर उपस्तिथ होते.
यावेळी रुग्णालयाच्या वतीने कोरोना काळात जी सेवा दिली त्या डॉक्टर तसेच परिचारिका यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री साई क्लिनिक आणि पार्वतीबाई शंकरराव चव्हाण रुग्णालयाचे संस्थापक संचालक डॉ. सुनील चव्हाण म्हणाले, “रुग्णांच्या देखभालीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा असलेल्या ३० खाटांचे रूग्णालय रुग्णसेवेसठी सज्ज झाले आहे. ऑक्सिजनची कमतरता भासु नये यासठी आम्ही हे ओ२ जनरेटिंग प्लांट उपलब्ध करुन दिले आहेत जेणेकरुन कोणत्याही रूग्णाला उपचारात अडचण येऊ नये किंवा त्यांना इतर चाचण्या तसेच ऑक्सिजनचा तुटवडा भासल्याने इतर केंद्रात स्थलांतरित करावे लागणार नाही.आता आपल्याकडे एकूण आहे. ३० बेड्ससह ५ आयसीयू बेड्सचा समावेश आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान आम्ही आमच्या रूग्णांना ऑक्सिजन आधार देण्यासाठी संघर्ष करीत होतो आणि त्यानंतर आम्ही प्रगत पॅथॉलॉजी सेवेसमवेत प्लांट बसविण्याचा निर्णय घेतला आमचे मुख्य उद्दीष्ट आहे की उत्तम काळजी आणि रूग्णांवर उपचार माफक दरात प्रभावी सेवा पुरवित आहोत.
या प्रसंगी बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, “मी या उपक्रमाबद्दल सर्वांच्या वतीने श्री साई क्लिनिक आणि पार्वतीबाई शंकरराव चव्हाण रुग्णालयाचे तसेच डॉ.सुनील चव्हाण आणि सचिन चव्हाण यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो. ऑक्सीजनची कमतरता भासणा-या रूग्णांसाठी हा प्रकल्प एक वरदान ठरणार आहे. रूग्णांना आता ऑक्सिजनच्या शोधात हॉस्पिटलच्या धावावे लागणार नाही. आता अशा उपक्रमांमुळे आरोग्य सेवावरील ताण कमी होईल आणि ऑक्सिजनची आवश्यकता असणार्या गंभीर रूग्णांना त्याची नक्कीच मदत होईल.
पाहा व्हिडीओ: