नीरज महामुरे / व्हा अभिव्यक्त!
एक विचार सतत मनात येऊ लागला. अशी उच्च शिक्षित, हुशार मुल आत्महत्येसारखं टोकाची पाऊल उचलत असतील तर, प्रश्न पडतो आपण सर्वचजण कुठेतरी कमी पडतोय का? यातून मार्ग आत्ताच काढला पाहिजे आणि मुलांना शिक्षणाच्या बरोबरीने जीवन जगण्याची कला, प्रत्येक संकटात कसे जगायचे याचे स्किल्स शिकवले पाहिजे. हे स्किल्स शिकवण्याची संपूर्ण जबाबदारी मुलांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि ती प्रामाणिकपणे पुर्ण केली पाहिजे. तरच पुढची पिढी बदलत्या काळाला सामोरं जाण्यासाठी सक्षम होईल.
काळ बदलतोय तसी शिक्षण पद्धती बदलली…
पण काहींना बऱ्याच कारणांमुळे बदलती शिक्षण पद्धती स्वीकारता आली नाही. अशी मुल शिक्षणापासून दूर जाऊ लागली, भविष्य अंधारात जाऊ लागले आहे. यावर पर्याय काढणे नितांत गरजेचे आहे.
बदलत्या शिक्षणपद्धतीचा एक भाग #ऑनलाइन शिक्षण!
ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या हातात दिवसभर मोबाईल येऊ लागला. कारण एक ते दोन तास #ऑनलाइन शिक्षण आणि दिवसभर भरपूर लिहिण्यासाठी, ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी दिलेला अभ्यास. सतत मोबाईलच्या संपर्कात आल्याने भविष्यात मुलांना त्रास होऊ नये याची काळजी पण घेणे गरजेचे आहे.
जी मुलं #ऑनलाइन शिक्षण घेत आहेत, मग शहरात किंवा ग्रामीण भागात असो ती शिक्षकांनकडून अभ्यास समजून घेत स्वतः करीत आहेत. प्रत्येक शिक्षक सर्व प्रयत्न करत #ऑनलाइन अभ्यास शिकवत आहे. शिकवताना नेटवर्क प्रॉब्लेम आला तरी पुन्हा पुन्हा अभ्यास शिकवत आहे.
परंतु #ऑनलाइन शिक्षणाला काही मर्यादा असल्याने तेही हतबल होत आहेत. अशा परिस्थितीत मुलसुद्धा निराश होताना दिसत आहेत.
केंद्र सरकार किंवा राज्य सरकार मध्ये प्रत्येक क्षेत्रातील ज्येष्ठ आणि तज्ञ मंडळी आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाचे भविष्य असणारे शालेय विद्यार्थी आणि युवकांनमध्ये कठीण प्रसंगी स्वतः मध्ये सकारात्मकता टिकून राहण्यासाठी शहर, गावपातळीवर सरकारच्या बरोबरीने प्रत्येकाने प्रयत्न आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी केलीच पाहिजे.
शेवटी काय तर भविष्यातील आधार म्हणजे सध्याच्या युवा वर्गाला मुलां/मुलींना वर्तमानकाळात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जात असताना संयम ठेवून परिस्थितीशी जुळवून घेत आरोग्य संभाळत जगायच कस हे शिकवलच पाहिजे!
शिक्षण #ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन प्रत्येकाला शालेय शिक्षणाच्या बरोबरीने जगण्यासाठी आवश्यक स्किल्स शिकवलेच पाहिजे.
खराेखर जगण्याचे स्किल्स मुलांना शिकवणे ,काळाची गरज आहे,मनापासुन धन्यवाद सर!👌👌👌🌷🌷🌷👍