मुक्तपीठ टीम
अहमदनगर मनपाच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे आणि उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड आज अधिकृतरीत्या घोषित झाली आहे. महापौर- उपमहापौर पदासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकेकच अर्ज दाखल झाले. कारण महापौर-उपमहापौर निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसने माघार घेतली. त्यामुळे भाजपाला सांगली, जळगाव पाठोपाठ अहमदनगर मनपात महाविकास आघाडीचा मोठा धक्का बसला आहे.
नगर महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे जी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! pic.twitter.com/EmsorfRSdg
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) June 29, 2021
नगरात आघाडीशाही!
• अहमदनगर मनपात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येत सत्ता मिळवली.
• शिवसेनेला महापौरपद, तर राष्ट्रवादीला उपमहापौरपद असं सत्तावाटपाचं सूत्र ठरलं, तसंच झालं.
• शिवसेनेच्या नगरसेविका रोहिणी शेंडगे महापौर झाल्या.
• राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गणेश भोसले उपमहापौर झाले आहेत.
• विरोधात कोणताही अर्ज दाखल न झाल्यानं बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट झाले होते.
• त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा आज केली केली.
२०१९ची चूक राष्ट्रवादीने सुधारली!
• अहमदनगरमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी २२ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
• या बैठकीत महापौर पदासाठी शिवसेनेचा उमेदवार देण्यावर एकमत झालं होतं.
• त्याआधी शिवसेना सर्वात मोठा पक्ष असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाशी हातमिळवणी करून शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले होते.
• राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे भाजपाचा महापौर बसला होता.
• त्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपाचे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीत असलेले आमदार शिवाजी कर्डिले यांचं नातं उपयोगी ठरलं होतं.