मुक्तपीठ टीम
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी ट्विटरद्वारे मोठी घोषणा केली आहे. मायावती यांनी उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावरच लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. मायावतींनी ट्विटद्वारे केलेली घोषणा ही एमआयएमशी युती करण्याच्या एका न्यूज चॅनलच्या बातमीला फेटाळण्यासाठी आहे. मात्र, त्यांनी पंजाब वगळता अन्य कोणत्याही राज्यात दुसऱ्या पक्षांशी युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मायावतींनी आज ट्विटद्वारे घोषणा
- एक वृत्तवाहिनीकडून कालपासून अशी बातमी दाखवली जात आहे की, उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभेची निवडणूक ओवेसींचा पक्ष एमआयएम व बसपा एकत्र मिळून लढणार आहेत.
- ती बातमी पूर्णपणे चुकीचे, अफवा पसरवणारे, तथ्यहीन आहे.
- त्या बातमीत काडीमात्रही सत्य नाही. बसपा या वृत्ताचे खंडण करते.
- मायावतींनी पुन्हा हे स्पष्ट केले आहे की पंजाब वगळता उत्तरप्रदेश व उत्तराखंड मधील २०२२ मध्ये सुरू होणाऱ्या विधानसभेची निवडणूक बसपा कोणत्याही पक्षाशी आघाडी करून लढणार नाही.
- बसपा या निवडणुका स्वबळावरच लढवणार.
1. मीडिया के एक न्यूज चैनल में कल से यह खबर प्रसारित की जा रही है कि यूपी में आगामी विधानसभा आमचुनाव औवेसी की पार्टी AIMIM व बीएसपी मिलकर लड़ेगी। यह खबर पूर्णतः गलत, भ्रामक व तथ्यहीन है। इसमें रत्तीभर भी सच्चाई नहीं है तथा बीएसपी इसका जोरदार खण्डन करती है। 1/2
— Mayawati (@Mayawati) June 27, 2021
सतीश मिश्र राष्ट्रीय बसपा माध्यम संयोजक
बसपाबद्दल अशा बनावट आणि दिशाभूल करणार्या बातम्या लक्षात घेऊन आता बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभेचे खासदार सतीशचंद्र मिश्रा यांना बसपा मीडिया सेलचे राष्ट्रीय संयोजक केले गेले आहे. त्यांनी माध्यमांना हे आवाहन केले आहे, बहुजन समाज पार्टी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष इत्यादी संदर्भात या प्रकारची इतर कोणत्याही दिशाभूल करणार्या बातम्या लिहिण्यापूर्वी, दर्शविण्यापूर्वी आणि प्रकाशित करण्यापूर्वी कृपया योग्य माहिती द्या.