मुक्तपीठ टीम
नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये सिनियर लेव्हल कन्सल्टन्स या पदासाठी २ जागा, मिडल लेव्हल कन्सल्टन्स या पदासाठी २१ जागा, इनुमेरटर्स या पदासाठी ६३ जागा अशा एकूण ८६ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) कृषी व संबंधित विषयांत पदवीधर / पदव्युत्तर, अर्थात कृषी, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान २) २ ते ४ वर्षे अनुभव
२) पद क्र.२- १) कृषी व संबंधित विषयांत पदवीधर / पदव्युत्तर, अर्थात कृषी, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान २) १ ते २ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) १ ते २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २४ ते ६५ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या अधिकृत वेबसाइट http://nabcons.com/ वरून माहिती मिळवू शकता.