मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकारण अनेक मुद्द्यावरून पेटत आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात अनेक वादावरून एकामेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. एकीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी ईडीची छापेमारी केली असताना दुसरीकडे शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज केली. काल भाजपाच्या कार्यकारिणीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल परब यांच्या चौकशीचा ठराव मंजूर केला गेला. त्यानंतर आज अनिल परबांमागोमाग मिलिंद नार्वेकरांवर किरीट सोमय्या यांनी तोफ डागली. त्यामुळे भाजपाच्या हिटलिस्टची दिशा आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांकडे वळल्याचे दिसत आहे.
भाजपाचे नेते किरीट सौमय्या यांनी थेट ठाकरेंच्या निकटवर्तियांवर आरोप केले आहेत. त्यांनी मिलिंद नार्वेकरांना दापोली-मुरूड किनाऱ्यावर अनिल परब यांच्या घरापासून काही फुटाचा अंतरावर बंगला बांधायला सुरूवात केली आहे. त्या जागेची किंमत ही १० कोटी आहे. असे सांगितले.
किरीट सौमय्यांचे नवे आरोप
• शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीच्या त्याच मुरुड गावाच्या समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीर प्रशस्त बंगला बांधायला सुरुवात केली आहे.
• याच मुरुड गावात अनिल परब यांनी बेकायदेशीररित्या रिसॉर्ट आणि बंगला बांधला आहे, ज्याची चौकशी सुरु आहे.
• अनिल परब यांचा बेकायदेशीर रिसॉर्ट आणि त्याचा जवळ स्वत: चा भव्य बंगला वर कारवाई येत्या काही दिवसात होणार असा विश्वास भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी व्यक्त केला आहे.
• याच समुद्रावर अनिल परब यांच्या पासून काही फूटाच्या अंतरावर मिलिंद नार्वेकर यांनी ७२ गुंठा जागा घेतली, त्यात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गैरकायदेशीररित्या भव्य दुमजली बंगल्याचे काम जोरात सुरु केले आहे.
सोमय्यांनी दिल्लीतही आघाडी उघडली
• मोठ्याप्रमाणात जंगलाची, झाडांची नासधूस सुरु आहे तसेच मोठ्याप्रमाणात उत्खनन ही सुरु आहे.
• भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी या संबंधात महाराष्ट्र सरकारचे पर्यावरण सचिव व महाराष्ट्र तटीय नियमन क्षेत्र (CRZ) च्या अध्यक्षा मनिषा म्हैसकर यांना भेटून तक्रार केली आहे.
• डॉ. सोमैया यांनी परवा दिल्ली येथे पर्यावरण सचिवांशी भेट घेऊन त्यांच्याकडेही या संबंधात तक्रार केली आहे.
• तसेच रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्यासाठी विनंती केली आहे.
अजित पवार, अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव
परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्यात राजकारण रंगलेले असतानाच भाजपाने पुढचा डाव खेळला आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्राच्या आधारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा ठराव भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला आहे.
भाजपाच्या ठरावाचे लक्ष्य पवार-परब
• अनिल देशमुखांवरील वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला.
• परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे.
• तशीच सीबीआय चौकश अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी कार्यकारिणीने केली आहे.