Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“हिंदमाता परिसरात रस्त्याची उंची वाढवल्याने वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल”

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

June 25, 2021
in सरकारी बातम्या
0
aaditya-thackeray

मुक्तपीठ टीम

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवर हिंदमाता उड्डाणपूल आणि परळ टीटी उड्डाणपूल यामधील रस्त्याची उंची वाढवून केलेल्या कामाचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी रस्त्याची उंची वाढल्याने सखल भागात पाणी साचून होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास मदत होईल, असे प्रतिपादन ठाकरे यांनी केले.

 

यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू, उपायुक्त विजय बालमवार आदी उपस्थित होते.

 

अधिक पावसामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवर हिंदमाता परिसरातील सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असे. हा अनुभव लक्षात घेऊन महानगरपालिकेमार्फत येथील १८० मीटरच्या रस्त्याची उंची सध्याच्या पातळीपेक्षा १.२ मीटरने वाढविण्यात आली आहे. या रस्त्याचे आज लोकार्पण करण्यात आले. यामुळे पूरजन्य परिस्थितीतही वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.

 

गांधी मार्केट येथील मिनी पंपिंग स्टेशनच्या कामाची पाहणी

महात्मा गांधी मार्केट येथील लघु उदंचन केंद्राच्या (मिनी पंपिंग स्टेशन) सुरू असलेल्या कामाचीही ठाकरे यांनी पाहणी केली. या ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्यांद्वारे प्रति मिनिट २.३३ लक्ष लिटर पाणी उपसण्याची क्षमता निर्माण होणार आहे. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू आदी उपस्थित होते.

 

पूरजन्य परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यास मदत होणार असल्याने या पंपिंग स्टेशनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश ठाकरे यांनी दिले.

 


Tags: aditya thackerayMayor Kishori Pednekarmumbaiआदित्य ठाकरेपरळ टीटी उड्डाणपूलमहापौर किशोरी पेडणेकरमुंबईहिंदमाता उड्डाणपूल
Previous Post

डेल्टा प्लस कोरोना विषाणूचा धोका! राज्यभर तिसऱ्या टप्प्यातील कडक निर्बंध!

Next Post

भाजपाच्या हिटलिस्टची दिशा आता ठाकरे – पवारांच्या निकटवर्तीयांकडे!

Next Post
sharad pawar-kirit somaiya

भाजपाच्या हिटलिस्टची दिशा आता ठाकरे - पवारांच्या निकटवर्तीयांकडे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!