मुक्तपीठ टीम
राज्यातील आशा सेविका आजपासून संपावर गेल्या आहेत. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सुमारे ७२ हजाराहून अधिक आशा सेविका कामावर न जाता घरी बसून हा संप करत आहेत. योग्य मानधन, आरोग्य सुविधा, विमा योजना यासारख्या मागण्या करुनही मागण्या मान्य होत नाहीत. अशा स्थितीत काम करणे कठीण आहे. त्यामुळे राज्यभरातील ७० हजार आशा सेविका आणि ४ हजार गट प्रवर्तकांनी संप करण्याचा निर्णय घेतला आहे.
या आहेत मागण्या
- कोरोना काळात केंद्र सरकार ३३ रुपयांप्रमाणे १००० रुपये देते तेही वेळेवर नाही. त्यासाठी रोज ३०० रुपये मानधन मिळावं.
- कोरोना काळात आशा सेविका, गट प्रवर्तक महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात राखीव बेड असायला हवेत.
- आशा सेविकांना मास्क, पीपीइ किट, ग्लोव्हज, सॅनिटाइजर मिळावेत, याशिवाय सॅनिटायझर, मास्क यासारखी सुरक्षा साधणेही मिळावीत.
- तब्बल ३ हजाराहून आशा कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाला मात्र सरकारकडून विमा किंवा आरोग्य सुविधा दिली जात नाही.
- ज्या आशा सेविकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे कोरोना काळात मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक मदत मिळावी.
- नियमानुसार ४ तास काम करणे अपेक्षित असताना १२ तास काम करावे लागत आहे.