मुक्तपीठ टीम
सामान्य प्रशासन विभागाने एसईबीसी प्रवर्गाती उमेदवारांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एसईबीसी प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नेमका कोणता निर्णय घेण्यात आला
- एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून ऐच्छिक स्वरूपाचा लाभ घेता येणार आहे.
- मात्र उमेदवारांना इडब्ल्यूएस प्रमाणपत्र आधीच देणं बंधनकारक राहणार आहे.
- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भरतीसाठी सामान्य प्रशासन विभागाची मंजुरी देण्यात आली आहे.
- तब्बल १३ हजार जागांसाठी भरती होणार आहे.
- मराठा आरक्षणाच्या न्यायालयातील निर्णयामुळे भरती रखडली होती.