मुक्तपीठ टीम
गेले काही दिवस कमी होत चाललेल्या राज्याच्या कोरोना रुग्णसंख्येत गुरुवारी बुधवारपेक्षा १,२१८ने वाढ झाली. महामुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातही रुग्णसंख्या कमी होत असताना राज्याची संख्या अचानक वाढण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात वाढलेली रुग्णसंख्या जबाबदार ठरली. त्यातही नाशिक महानगर आणि ग्रामीणसह नाशिक जिल्ह्यात १,५१४ ने वाढलेली नवीन रुग्णसंख्या राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या बुधवारपेक्षा वाढवण्यास कारणीभूत ठरली आहे. आज ११ हजार ४४९ रुग्ण बरे होऊन घऱी परतले.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
- आज राज्यात १२,२०७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ११,४४९ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५६,०८,७५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ३९३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.७७% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,७३,५६,७०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,७६,०८७ (१५.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १०,७६,१६५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,३८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,६०,६९३ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,०७९ (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०२,०५८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- कोकण ०१,२४७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
- उ. महाराष्ट्र ०२,४८६ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ००,७३८ (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ००,५९९ (कालपेक्षा वाढ)
एकूण नवे रुग्ण १२ हजार २०७ (कालपेक्षा १,२१८ जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १२,२०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,७६,०८७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे
१ मुंबई महानगरपालिका ६५५
२ ठाणे १०५
३ ठाणे मनपा ११२
४ नवी मुंबई मनपा ६३
५ कल्याण डोंबवली मनपा १५४
६ उल्हासनगर मनपा ११
७ भिवंडी निजामपूर मनपा २
८ मीरा भाईंदर मनपा ७२
९ पालघर १८८
१० वसईविरार मनपा ११६
११ रायगड ४९२
१२ पनवेल मनपा ८८
ठाणे मंडळ एकूण २०५८
१३ नाशिक ६६७
१४ नाशिक मनपा ८२६
१५ मालेगाव मनपा १७
१६ अहमदनगर ७४३
१७ अहमदनगर मनपा ४१
१८ धुळे ४४
१९ धुळे मनपा २६
२० जळगाव ९८
२१ जळगाव मनपा २०
२२ नंदूरबार ४
नाशिक मंडळ एकूण २४८६
२३ पुणे ७४७
२४ पुणे मनपा ३६२
२५ पिंपरी चिंचवड मनपा २२९
२६ सोलापूर ३७६
२७ सोलापूर मनपा ३३
२८ सातारा ८४८
पुणे मंडळ एकूण २५९५
२९ कोल्हापूर १०५०
३० कोल्हापूर मनपा ३९०
३१ सांगली ८९३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १५१
३३ सिंधुदुर्ग ६१५
३४ रत्नागिरी ६३२
कोल्हापूर मंडळ एकूण ३७३१
३५ औरंगाबाद ९४
३६ औरंगाबाद मनपा १४
३७ जालना ९४
३८ हिंगोली ३
३९ परभणी १८
४० परभणी मनपा ७
औरंगाबाद मंडळ एकूण २३०
४१ लातूर ३८
४२ लातूर मनपा १७
४३ उस्मानाबाद १२३
४४ बीड १६७
४५ नांदेड ११
४६ नांदेड मनपा १३
लातूर मंडळ एकूण ३६९
४७ अकोला ४३
४८ अकोला मनपा ४१
४९ अमरावती १०३
५० अमरावती मनपा २६
५१ यवतमाळ १००
५२ बुलढाणा १११
५३ वाशिम ११
अकोला मंडळ एकूण ४३५
५४ नागपूर ३९
५५ नागपूर मनपा ५६
५६ वर्धा ५६
५७ भंडारा ४
५८ गोंदिया १६
५९ चंद्रपूर ५८
६० चंद्रपूर मनपा २६
६१ गडचिरोली ४८
नागपूर एकूण ३०३
एकूण १२ हजार २०७
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ३९३ मृत्यूंपैकी २३९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १५२२ ने वाढली आहे. हे १५२२ मृत्यू, ठाणे-५७३, पुणे-२४४, नाशिक-८६, अहमदनगर-६७, नांदेड-५८, बीड-५७, यवतमाळ-५७, रायगड-५०, नागपूर-४२, जालना-४०, कोल्हापूर-३६, बुलढाणा-३३, सांगली-३२, अकोला-२१, पालघर-१८, सातारा-१८, चंद्रपूर-१५, रत्नागिरी-१२, औरंगाबाद-१०, गोंदिया-१०, नंदूरबार-९, परभणी-८, सोलापूर-८, हिंगोली-५, उस्मानाबाद-५, गडचिरोली-२, लातूर-२, अमरावती-१, धुळे-१, सिंधुदुर्ग-१ आणि वर्धा-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १० जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)