मुक्तपीठ टीम
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे येथील औद्योगीक वसाहतीला भीषण आग लागण्याची दुर्घटना घडली आहे. ही आग तेथील क्लोरिफाईट कंपनीत लागली असून आतापर्यंत १५ महिला आणि २ पुरुषांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. या कंपनीचे नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असे आहे. ही सॅनिटायझर निर्मिती करणारी कंपनी असून आग कश्यामुळे लागली याबद्दल अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
कंपनीला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळवण्यासीठी प्रयत्न सुरू केले आहेत.
नेमक घडले काय?
- मुळशीच्या एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली.
- तसेच आग लागल्याच्या ठिकाणी पंधरा ते वीस कामगार अडकून पडले असल्याची प्राथमिक माहिती होती.
- या कंपनीत सकाळी एकूण ४१ कामगार कामासाठी आले होते.
- त्यातील १७ कामगारांचा मृत्यू झाला असून त्यात १५ महिला तर २ पुरुष आहेत.
- तसेच इतर कामारांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, केमिकल्समुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूराचे लोट उसळत आहेत. अग्नीशमन दल कामागरांना या भीषण आगीतून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे.