Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम! केंद्र सरकार देशात उत्पादन झालेल्या ७५ टक्के लसी विकत घेणार!

२१ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाचा योग दिनी शुभारंभ

September 5, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
PM Narendra Modi in neeti ayog -1

मुक्तपीठ टीम

नरेंद्र मोदी यांचे भाषण आज लसटंचाईशी झुंज देणाऱ्या सामान्य नागरिकांपासून ते राज्य सरकारांपर्यंत सर्वांनाच दिलासा देणारे ठरले. त्यांनी देशात २१ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाची घोषणा केली. २१ ते ४४ वर्षांपर्यंतच्या युवावर्गासाठीही आता केंद्र सरकारच लसी पुरवणार आहे. आतापर्यंत ४५ वर्षांवरील लसीकरणासाठीच केंद्र सरकार लस पुरवत होते. आता देशात उत्पादन झालेल्या लसींपैकी ७५ टक्के लसी केंद्र सरकार विकत घेणार आहे. उरलेल्या २५ टक्के लसी खासगी रुग्णालयांना दिल्या जातील. त्यांनी लसींच्या किंमतीपेक्षा फक्त १५० रुपयेच जास्त घ्यावेत असे निर्बंध असतील.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. कोरोनाविरोधातील युद्धासाठी त्या घोषणा महत्वाच्या आहेत.

देशातील २१ वर्षांवरील प्रत्येकाला मोफत लस

  • योग दिनापासून म्हणजेच २१ जूनपासून केंद्र सरकारतर्फे देशातील २१ वर्षांवरील सर्वांना मोफत लस दिली जाईल.
  • कोणत्याही लसीवर कोणत्याही राज्य सरकारला खर्च करावा लागणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
  • आतापर्यंत देशातील कोट्यवधी लोकांना विनामूल्य लस दिली गेली आहे आणि आता १८ वर्षांवरील युवावर्गदेखील लाभार्थी होतील.
  • कोरोना लसबाबत निर्माण झालेल्या गैरसमजांवर ते म्हणाले की, कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये.
  • देशातील प्रत्येकाने ही लस घ्यावी आणि समाजातील प्रत्येकाने ही लस घ्यावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

 

लसीकरणाची गती आणि व्याप्ती वाढवली

  • जगातील अनेक देशांमध्ये लसीची मागणी जास्त आहे आणि लस बनविणार्‍या कंपन्या कमी आहेत.
  • भारताकडे स्वतःची लस नसती तर परिस्थिती वेगळी असती.
  • मागील ६० वर्षांचा इतिहास सांगतो की जगात लस आल्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर लस यायची.
  • पंतप्रधान म्हणाले की सन २०१४मध्ये मध्ये लसीकरणाची व्याप्ती केवळ 60 टक्के होते.
  • जर या वेगाने वाढ झाली असती तर देशाला लसी देण्यास ४० वर्षे लागली असती.
  • आम्ही लसीकरण गती वाढविली आणि व्याप्ती देखील वाढविली.
  • एकाच वर्षात भारताने दोन लस तयार केल्या आणि आतापर्यंत २३ कोटी लस डोस देण्यात आले आहेत.

Tags: coronacorona vaccinationprime minister narendra modiकेंद्र सरकारकोरोनापंतप्रधान नरेंद्र मोदीलसीकरण
Previous Post

राज्यात नवे रुग्ण १० हजार २१९, दुपटीपेक्षा जास्त घरी परतले! गोंदियात फक्त ४ रुग्ण!

Next Post

सॅनिटायझरने दुसऱ्यांचे जीवन सुरक्षित ठेवणाऱ्या कामगारांचाच आगीत होरपळून मृत्यू

Next Post
pune fire

सॅनिटायझरने दुसऱ्यांचे जीवन सुरक्षित ठेवणाऱ्या कामगारांचाच आगीत होरपळून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!