मुक्तपीठ टीम
मुंबई पोलिसांनी मध्यप्रदेशातील मिरतमधील एका औषध कारखानदारास अटक केली आहे. मिरतमधील धीरखेडा औद्योगिक क्षेत्रात त्याचा कारखाना आहे. त्याच्यावर बनावट औषध बनविण्याचा आरोप आहे. त्या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकला असून कारखान्याच्या मालकाला अटक केलीआहे. ८ दिवसांपूर्वी गाझियाबादच्या एका औषध विक्रेत्याला बनावट औषधांसह पकडण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
स्थानिक पोलीस अधिकारी सीओ किठौर बृजेश कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मुंबई कांदिवली येथील समता नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अप्पा साहेब शिरसाट यांनी मिरत पोलिसांना बनावट औषध धंद्याविषयी कळवले. काही दिवसांपूर्वी गाझियाबादच्या सुदीप मुखर्जीला बनावट औषधांसह अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्याच्याकडून पॅरासिटामॉल, डिक्लोफेनाक व इतर औषधे जप्त केली आहेत.
मुंबई पोलिसांची अचानक कारवाई
- चौकशी दरम्यान आरोपी सुदीप मुखर्जीने सांगितले की तो धीरखेडा औद्योगिक क्षेत्रातील एबीएम लॅब प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून औषधे खरेदी करतो आणि बाजारात पुरवतो.
- शनिवारी रात्री मुंबई पोलिसांनी खारखौदा पोलीस स्टेशन आणि ड्रग्स विभागाच्या अधिकाऱ्यांसह कारखान्यावर छापा टाकला.
- मुंबई पोलिसांनी कारखान्याचे मालक संदीप मिश्राला ताब्यात घेतले.
- त्या कारखान्यात तयार होणार्या औषधांचे नमुने घेऊन कारखाना सील केला.
- दुसरीकडे, संदीप मिश्रा यांचे म्हणणे आहे की, मुंबईत जप्त केलेल्या औषधांशी माझा काही संबंध नाही. माझ्या कारखान्यात खुल्या गोळ्या बनवल्या जातात, तर मुंबईत पकडलेल्या औषधांवर रॅपर लावला आहे. सुदीपने माझ्या फॅक्टरीतून औषधे विकत घेतली आहेत. एखाद्याला वाचवण्यासाठी माझ्याविरूद्ध कट रचला जात आहे.