मुक्तपीठ टीम
कोरोना विषाणू हा चीनच्या वुहान लॅबमधूनच पसरल्याचा आरोप पुन्हा केला जात आहे. अमेरिकने या मुद्द्यावर जागतिक आरोग्य संघटनेला धारेवर धरत थेट मोहीम राबवली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील एका वैज्ञानिक दांपत्याने जगभरातून जमवलेल्या पुराव्यांच्या आधारे कोरोना विषाणू हा चीनच्या वुहान लॅबमधूनच पसरल्याचा दावा केला आहे. त्यामुळे चीनची पोलखोल झाल्याचे मानले जाते. कारण चीनी भाषेतील कागदपत्रांचे भाषांतर करत वैज्ञानिक आणि इतरांच्या जागतिक समुहाने कोरोना विषाणूच्या उत्पतीचा चीनमधील माग २०१२पर्यंत असल्याचे उघड केले आहे.
पुण्यातून वुहानचं पाप उघडकीस
- पुण्यातील वैज्ञानिक दांपत्य डॉ. राहुल बाहुलीकर आणि डॉ. मोनाली राहलकर यांनी चीनचे पाप उघडकीस आणले आहे.
- वेगवेगळ्या देशांमधील विज्ञान क्षेत्रातील लोकांसोबत इंटरनेटवरून संपर्क साधत त्यांनी काही माहिती आणि पुरावे एकत्रित केले.
जगभरातून चीनविरोधात पुरावे
- जगभरातील वैज्ञानिकांनी आपल्या समुहाला ड्रैस्टिक (डीसेन्ट्रलाइज्ड रेडिकल ऑटोनॉमस सर्च टीम इन्वेस्टिगेटिेंग कोविड-19) असे नाव दिले आहे.
- या लोकांनी एकत्रित केलेल्या माहितीवरून, सार्स-सीओव्ही-२ विषाणू सी फूड मार्केटमधून नव्हे, तर वुहानच्या लॅबमधूनच उत्पन्न झाला, असे स्पष्ट झाले आहे.
- त्यांचा सिद्धांताला षड्यंत्र म्हणून फेटाळण्यात आले होता.
- आता मात्र त्यांच्या निष्कर्षांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
- अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
२०१२पासून कोरोना विषाणूची सुरुवात
- या समुहातील काही लोक चिनी माहितीचे भाषांतर करीत आहेत आणि त्यांच्या स्तरावर ते तपासत आहेत.
- चिनी शैक्षणिक कागदपत्रे आणि गुप्त कागदपत्रांनुसार याची सुरुवात २०१२ पासून होते.
- या लोकांना २०२० मध्ये संशोधनाला सुरूवात केली.
- सार्स-सीओव्ही-२ शी संबंधित आरएटीजी१३ दक्षिण चीनच्या युन्नात प्रांतातील मोजियांगच्या गुहांमधून एकत्र करण्यात आले.
- आरएटीजी१३ देखील एक कोरोना विषाणू आहे.
- हा विषाणू वुहान इंस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी येथे नेण्यात आला.
चीनी प्रयोगशाळेत डीएनएत बदल करुन कोरोना विषाणू
- गुहांमध्ये मोठ्या प्रमाणावर वटवाघळं होती हे साफ करण्यासाठी सहा खान कामगार ठेवण्यात आले.
- ते निमोनियासारख्या आजाराने संक्रमित झाले होते, असे त्यांना आढळले.
- विषाणूच्या जीनोममध्ये बदल केल्याने तयार झाला कोरोना.
- वुहान इंस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि वुहानमध्ये नंतरही काही लॅब विषाणूवर प्रयोग करत होत्या, असे ते म्हणाले.
- त्यांनी विषाणूच्या जीनोममध्ये काही बदल केल्याची शक्यता आहे आणि याच दरम्यान या कोरोना विषाणूची उत्पत्ती झाली असावी अशी शक्यता आहे.