मुक्तपीठ टीम
राज्यात एकीकडे लसींचा तुटवड्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सध्या बंद ठेवण्यात आले असून, दुसरीकडे मात्र ठाणे मनपाच्या पार्किंग प्लाझा येथील कोरोना सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे सांगत चक्क एका अभिनेत्रीने लसीकरण करुन घेतल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सध्या केवळ ४५ वर्षांहून अधिक वयाच्या आणि फ्रंटलाईन वर्कर्सला लसीकरण करण्यात येत आहे. संबंधित अभिनेत्रीकडे कोरोना सेंटरमध्ये सुपरवायझर असल्यानं फ्रंटलाईन वर्करचं बनावट ओळखपत्र दाखवल्याने तिचे लसीकरण झाले. भाजपने या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.
अभिनेत्रीकडे फ्रंटलाइन वर्करचं ओळखपत्र कसं?
- या अभिनेत्रीला फ्रंटलाईन वर्करचे ओळखपत्र कोणत्या संस्थेने दिले आणि कशासाठी दिले हे तपासले जावे.
- त्यामुळे आता ओळखपत्र देणारी संस्थादेखील अडचणीत आली आहे.
- या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाणे मनपाचे भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे.
- पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे तोंडी सांगितले आहे.
- मीरा चोप्राला पार्किंग प्लाझा येथे लस कशी मिळाली?
ते वयात बसतात का? त्यांच्यासाठी लस कशी उपलब्ध करुन दिली जाते, या प्रकरणाची चौकशी करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे”, असे ठाणे महानगर पालिका भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी सांगितले आहे.
नियमबाह्य लसीकरण झालेली मीरा चोप्रा आहे तरी कोण?
- या अभिनेत्रीचं नाव मीरा चोप्रा असं आहे.
- या अभिनेत्रीने लस घेतल्यानंतर स्वतःच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवर लस घेतल्याची पोस्ट टाकली होती.
- या प्रकरणावरुन सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर मीरा चोप्रा हिने आपले फोटो काढल्याचेही दिसून आले आहे.
खासगी कंपनीकडून ओळखपत्र
- ओम साई आरोग्य केयर सेंटर या खाजगी कंपनीने मीरा चोप्रा हिला सुपरवायझर भासवून लस देण्यात आल्याची बाब समोर आलेली आहे.
- या प्रकरणी संबंधित कंपनी आणि इतर जणांवर पालिका प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी भाजप गट नेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे.