मुक्तपीठ टीम
राजस्थानातील शेतकऱ्यांना पुढील १८ महिन्यांकरिता प्रति युनिट केवळ दोन रुपये दराने वीज मिळणार आहे. राज्यातील सौरऊर्जेचा फायदा सरकारी वीज वितरण कंपन्यांना होऊ लागला आहे. राजस्थान ऊर्जा विकास महामंडळ पुढील १८ महिन्यांसाठी १०७० मेगावॅट वीज केवळ दोन रुपये प्रति युनिटवर विकत घेईल. राज्यात शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी ही वीज वापरली आहे.
त्यापैकी ६०० मेगावॅट वीज प्रति युनिट २ रुपये आणि ४७० मेगावॅट वीज प्रति युनिट २.०१ रुपये दराने उपलब्ध होईल. हा आतापर्यंतच्या कराराचा सर्वात कमी दर असल्याचे म्हटले जाते. २०१९ मध्ये जाहीर झालेल्या नवीन सौर आणि पवन ऊर्जा धोरणामुळे हे शक्य होईल असे ऊर्जामंत्री बीडी कल्ला यांनी सांगितले आहे. दिवसभरात राज्यातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यासाठी राजस्थान ऊर्जा विकास महामंडळाने सौरऊर्जा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच एसईसीआयशी करार केला आहे.
पाहा व्हिडीओ :