मुक्तपीठ टीम
मुंबई उच्च न्यायालयातील दहा अतिरिक्त न्यायाधाशांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत हे न्यायाधीश अतिरिक्त न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत होते.
भारताच्या राष्ट्रपतींनी, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१७ च्या कलम 1) ने बहाल केलेल्या अधिकारांचा उपयोग करीत पुढील दहा अतिरक्त न्यायाधीशांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे:
- अविनाश गुणवंत घरोटे
- नितीन भगवंतराव सूर्यवंशी
- अनिल सत्यविजय किलोर
- मिलिंद नरेंद्र जाधव
- मुकुंद गोविंदराव सेवलीकर
- वीरेंद्रसिंह ज्ञानसिंह बिष्ट
- देबद्वार भालचंद्र उग्रसेन
- श्रीमती मुकुलिका श्रीकांत जवळकर
- सुरेंद्र पंढरीनाथ तावडे
- नितीन रुद्रसेन बोरकर
हे दहाजण आतापर्यंत मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यांना आता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले आहे. यासंदर्भातील अधिसूचना आज विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाने जारी केली आहे.