मुक्तपीठ टीम
गोदरेज अँड बॉइस दशकांपासून जैवविविधतेच्या संवर्धनासाठी योगदान देत आली आहे. नौरोजी गोदरेज सेंटर फॉर प्लाण्ट रिसर्च म्हणजेच एनजीसीपीआरने मुंबईच्या ईशान्य भागामधील खारफुटींप्रमाणेच पश्चिम घाटांमध्ये आढळून येणा-या स्थानिक वनस्पतींच्या प्रजातीवर संशोधन केले आहे.
मागील १४ महिन्यांमध्ये गोदरेज रिसर्चने २ नवीन प्रजातींचा शोध लावण्यासोबत एका नवीन संकरित प्रजातीला नवीन नाव दिले आहे. दोन नवीन प्रजातींपैकी एका प्रजातीचा शोध १८५ वर्षांनंतर लागलेला आहे आणि या प्रजातीला जिल्हाधिकारी अल्फ्रेड प्रेन्टिस यंग यांच्या नावावरून अल्फ्रेड कॉमेलिना असे नाव देण्यात आले आहे. एनजीसीपीआरमधील बॉटनी प्लाण्ट टॅक्सोनॉमीचे वैज्ञानिक डॉ. मयुर डी. नंदीकर यांनी या प्रजातीचा शोध लावला.
एनजीसीपीआर महाराष्ट्रातील शिरवळ येथील त्यांच्या संवर्धन केंद्रामध्ये १०० हून अधिक स्थानिक वनस्पतींच्या प्रजातींचे सक्रियपणे संवर्धन करत आले आहेत आणि त्यांच्या वनस्पती संग्रहालय म्हणजेच हर्बेरियममध्ये ५,००० हून अधिक प्रजातींचे संवर्धन केले आहे. संस्थेला वनस्पती प्रजातींच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय संघटना आयएपीटीकडून अनुदान मिळाले, ज्यामुळे एनजीसीपीआर ही प्रतिष्ठित अनुदान मिळणारी भारतातील पहिली संस्था आहे.
‘आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन २०२१’ निमित्त युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय (एमओईएफअॅण्डसीसी) ‘अदर इफेक्ट्स एरिया-बेस्ड कन्झर्वेशन मेझर्स’ (ओईसीएम) कॉम्पेन्डियम प्रकाशित करत आहेत. गोदरेज खारफुटी संवर्धन प्रकरण संशोधन या प्रतिष्ठित प्रकाशनामध्ये समाविष्ट होणे अत्यंत सन्मानाचे आहे.
Biodiversity is key to the health of our planet. At Godrej & Boyce, we’re committed to making sure the bio-diversity of our world isn’t depleted or degraded in the name of development. pic.twitter.com/FL5JWSWZBd
— Godrej & Boyce (@GodrejAndBoyce) May 22, 2021
२०१८ मध्ये कंपनीला इंडिया बायोडायव्हर्सिटी अवॉर्ड मिळाल्यानंतर यूएनडीपीने गोदरेजची या प्रकाशनामध्ये समावेश करण्याची शिफारस केली. आजचे ओईसीएम पोर्टल आणि कॉम्पेन्डियम एमओईएफअॅण्डसीसीचे माननीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येईल. १९४० पासून गोदरेज अँड बॉइस विक्रोळी येथील खारफुटीचे संवर्धन करत आली आहे. यामध्ये वनस्पती, प्राणी, पक्षी व कीटकांच्या १६०० हून अधिक विभिन्न प्रजाती आहेत आणि या प्रजाती मुंबईच्या #UrbanLungs आहेत.
स्थानिक वातावरणावर खारफुटींचा परिणाम समजून घेण्यासाठी गोदरेज अँड बॉइस येथील वैज्ञानिकांच्या टीमने केलेल्या संशोधनाने अंदाज वर्तवला की, विक्रोळी येथील गोदरेज खारफुटी क्षेत्राने अस्तित्त्वात आल्यापासून दहा लाख टनांहून अधिक कार्बन शोषून घेतले आहे. खारफुटी मुंबई शहरातील प्रदूषण पातळ्या कमी करण्यामध्ये आणि हवा शुद्ध करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. हीच बाब लक्षात घेत कंपनी मुंबईतील विक्रोळी येथील तटीय क्षेत्रे व भूप्रदेशांचे संरक्षण करण्यास कटिबद्ध आहे.
पर्यावरणासाठी गोदरेजचे उपक्रम
- डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियासोबत सहयोग केला आणि भारतातील ८ राज्यांमध्ये जागरूकता मोहिम राबवली.
- ११ भाषांमध्ये अनोखे मॅन्ग्रोव्ह्ज मोबाइल अॅप्लीकेशन सादर केले, ज्यामध्ये खारफुटींचे साह्य असलेल्या जैवविविधता पर्यावरणाबाबत माहिती आहे.
- मुलांना पर्यावरणाच्या महत्त्वाबाबत जागरूक करण्यासाठी प्रख्यात चिल्ड्रेन्स लेखक काटी बगली यांच्यासोबत सहयोगाने इंग्रजी व मराठी भाषेमध्ये अद्वितीय स्टोरी बुक ‘मेनी सिक्रेट्स ऑफ मॅन्ग्रोव्ह्ज’ प्रकाशित केले.
- मुले, पर्यावरणप्रेमी व लोकांना मोठ्या प्रमाणात खारफुटींच्या महत्त्वाबाबत जागरूक करण्यासाठी या तटीय वनाबाबत व्यापक माहिती सांगणारी वेबसाइट www.mangroves.godrej.com सादर केली. ही वेबसाइट असा एकमेव स्त्रोत आहे, जी मराठीत उपलब्ध आहे.
पाहा व्हिडीओ: