मुक्तपीठ टीम
अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या टीमला मंगळावर सेंद्रीय मीठ अस्तित्त्वात असल्याचे आढळले आहे. हे मीठ मंगळावरील ऑर्गेनिक कंपाउंड्सचे भाग आहेत जे नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरने पूर्वी शोधले होते. मंगळावर ऑर्गेनिक कंपाउंड्स आणि मीठातील भौगोलिक प्रक्रिया किंवा जीवाणूंचा समावेश असू शकतो.
पृथ्वीसारखे एक नवे जग निर्माण होण्याची शक्यता
• नासाच्या मते, मीठाचा शोध लागल्याने मंगळावर प्रथमच सेंद्रीय घटकांची शक्यता बळकट होते.
• तेथे पृथ्वीसारखे एक नवे जग निर्माण होण्याची शक्यताही वाटते.
• पृथ्वीवर असे जीवन आढळले आहे, जे सेंद्रीय मीठ, ऑग्जलेट आणि अॅसीटेटवर अवलंबून असते.
• मंगळावरील अधिक संशोधनासाठी नासाला सेंद्रीय रेणू शोधणे महत्वाचे आहे, पण ते आव्हानात्मक आहे.
• मंगळाच्या पृष्ठभागावर किरणांनी सेंद्रीय घटक संपू शकतात.
सेंद्रीय मीठ सापडले तर तेथे अधिक शोध घेणार
• नासाच्या गॉडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमधील ऑर्गेनिक रसायनशास्त्रज्ञ जेम्स लुईस यांनी पुढील दिशा स्पष्ट केली आहे.
• जर मंगळावर कोठेही सेंद्रीय मीठ सापडले तर आम्ही त्या भागात अधिक तपासणी केली जाईल.
• जेथे सेंद्रीय घटक सुरक्षित आढळतील त्या पृष्ठभागाच्या खाली ड्रिल करणार.
• लुईसच्या प्रयोगशाळेतील प्रयोग आणि क्युरोसिटीमध्ये लावलेल्या पोर्टबल लॅबमधून मिळालेल्या डेटाच्या आधारे सेंद्रीय मीठाचे पुरावे मिळालेले आहेत.
एसएएम सारख्या उपकरणांसह मंगळावर मीठ शोधणे कठीण आहे. ते मंगळाची माती आणि खडक गरम करते ज्यामधून वायू उत्सर्जित होतात. सेंद्रीय मीठ गरम झाल्याने जो वायू उत्सर्जित होईल तो मंगळाच्या मातीतून इतर गोष्टीतून उत्सर्जित होऊ शकतो, ही अडचणीची बाब आहे. रसायनशास्त्र आणि खनिजशास्त्रासाठीच्या उपकरणांद्वारे शोधण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु अद्याप सापडलेले नाही.