Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

परराष्ट्र मंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्याने लस टंचाई दूर करण्याचा मार्ग मिळण्याची शक्यता

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
s jaishankar

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहेच. संसर्ग आणि मृत्यूची साखळी तोडण्यासाठी लसीकरण हाच एक मार्ग असल्याचे तज्ज्ञांकडून म्हटले जात आहे. पण देशात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर येत्या २४ मे पासून पाच दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान एस जयशंकर अमेरिकेतील कंपन्यांसोबत कोरोना प्रतिबंधक लसीची खरेदी आणि त्यानंतर त्या लसींच्या संयुक्त उत्पादनाच्या शक्यतांवर चर्चा करणार आहेत. त्यामुळे अमेरिकेकडून लसींचा मोठा साठा मिळण्याबरोबरच त्यांच्या भारतातील संयुक्त उत्पादनाचीही सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परराष्ट्रमंत्र्यांचा अमेरिका दौरा भारतातील लस टंचाई दूर करण्यासाठी उपयोगी ठरण्याची शक्यता आहे.

 

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, एस जयशंकर २४ मे ते २८ मे दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तसेच या दौऱ्यादरम्यान न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुतारिस यांची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

एस जयशंकर यांचा विदेश दौरा

  • कोरोनाच्या या संकट काळात एस जयशंकर यांचा विदेश दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
  • परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जयशंकर वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे परराष्टमंत्री अँटनी ब्लिंकेन यांच्याशी चर्चा करतील.
  • याव्यतिरिक्त जयशंकर अमेरिकेतील मंत्रिमंडळाचे सदस्य आणि तेथील प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतील.
  • जयशंकर यांचा अमेरिकचा दौरा अशा वेळी आयोजित करण्यात आहे, जेव्हा अलिकडेच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी अमेरिकतील उद्योजकांसोबत लस खरेदी आणि त्यानंतर संयुक्तपणे उत्पादन करण्याच्या शक्यतेवर चर्चा करीत असल्याचं म्हटलं आहे.

अमेरिका देणार गरजू देशाना लस

  • अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी पाच दिवसांपूर्वीच लसीची गरज असणाऱ्या देशांना फायझर-बायोनोटेक, मॉर्डना आणि जॉनसन अँड जॉनसनया कोरोना प्रतिबंधक लसीचे २ कोटी डोस देणार असल्याची घोषणा केली आहे.
  • याव्यतिरिक्त अॅस्ट्रॅजेनेका लसींच्या ६ कोटींच्या डोसचाही यात समावेश असणार आहे. (ही लस भारतात कोविशिल्ड या नावाने उपलब्ध आहे.)
  • परंतु अद्याप लसींचे वितरण किती, कोणाला आणि कसे होणार, हे स्पष्ट झालेले नाही. भारतीय परराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान यावरही चर्चा होऊ शकते.

 


Tags: AstraZenecacoronajoe bidenअमेरिकाकोरोनाजो बायडनपरराष्ट्रमंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर
Previous Post

मंगळावर नासाला सापडला मीठ असण्याची शक्यता दर्शवणारा पुरावा….

Next Post

रेल्वेच्या २२४ ऑक्सिजन एक्स्प्रेसने १४ हजार ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा देशभरात पुरवठा

Next Post
oxygen express

रेल्वेच्या २२४ ऑक्सिजन एक्स्प्रेसने १४ हजार ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा देशभरात पुरवठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!