Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वृक्षारोपण करून आठवणी जपण्याचा…वाढवण्याचा वसा!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
tree plantation

विलासबाबा जवळ/वर्षा विलास जवळ

आमच्या परिवाराची ज्यांच्यावर अपार श्रध्दा आहे. सामाजिक कार्याचे धडे ज्यांच्याकडून मिळाले आणि सामाजिक क्षेत्रात ज्यांच्यामुळेच स्थान प्राप्त झाले ते म्हणजे व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक आदरणीय गुरूवर्य संतवीर बंडातात्या कराडकर. त्यांचा दोन दिवसांपूर्वी फोन आला. मी लोणंदला जाणार असून जाताजाता तुमच्याकडे येणार आहे. आदरणीय तात्या घरी येणार म्हंटल्यावर सर्वांनाच आनंद वाटतो. सर्व तयारी सुरू असतानाच तारखेकडे लक्ष गेले. आदरणीय तात्या आपल्याकडे येणार ती तारीख आहे २१ मे. याच दिवशी आम्हां उभयतांच्या लग्नाला २६ वर्षे पूर्ण होत आहेत. तसा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचे आम्ही नेहमीच टाळतो. पण या दिवसाचे औचित्य साधुन आम्ही काहीतरी विधायक उपक्रम राबवित असतो. तीन आठवड्यापूर्वीच अल्पशा आजाराने आमचे मसुरचे साडू अजय जाधव यांचे अकाली देहावसन झाले त्या धक्क्यातून अजूनही आमची हॅप्पी फॅमिली सावरलेली नाही.

vilas javal

आमचे चिरंजीव आकाश यांनी एक कल्पना सुचवली आदरणीय तात्या २१ मे रोजीच योगायोगाने आपल्या घरी येत आहेत तरं अजयकाकांच्या स्मृतीपित्यर्थ आपण एक झाड लावूया. अनेक औषधी गुणधर्म असणारा व रोजच्या आहारात वापरल्या जाणार्‍या कडीपत्त्याच्या रोपाचे रोपण आदरणीय तात्यांच्या व आम्हां दोघांच्या हस्ते लावण्यात आले. या प्रसंगी संजय अहिरेकर सर, नावडकर आप्पा, राजुमहाराज, राममहाराज, सुरेशबुवा जवळ, तुकारामबुवा जवळ, अरूणबापू जवळ उपस्थित होते.

 

यावेळी आदरणीय बंडातात्या महाराज म्हणाले जन्माला आलेल्या प्रत्येकालाच जायचे आहे. पण तरूण वयातील मृत्यु स्वकियांना नक्कीच अतिशय वेदनादायी व दुःख दायक असतो. माणूस शरिराने जातो पण त्याच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपण करण्याचा उपक्रम स्तुत्य असून प्रत्येकाने हा आदर्श उपक्रम राबवायलाच हवा. आमच्या संघटनेच्या दोन तरूण कार्यकर्त्यांच्या स्मृतीपित्यर्थ आम्ही पिंपरद येथिल गुरूकुल मध्ये वृक्ष लावले असून त्या वृक्षांना त्यांची नावेही दिली असल्याचा उल्लेख आवर्जुन त्यांनी यावेळी केला.

 

निसर्गप्रेमी उपक्रमांमधून निसर्गाच्या जवळ राहते जवळवाडी

वर्षा विलास जवळ यांची ८ मे २०१९ रोजी सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील जवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर त्यांनी गावात अभिनव उपक्रम सुरू केले. सत्कारामधे शाल-श्रीफळ न देता “नको शाल,नको श्रीफळ आता,करू वृक्षारोपण, नटवू हिरवाईने धरती माता”! अशा घोषवाक्यासह शेकडो रोपांचे वाटप त्यांनी केले आहे. वाढदिवस असो वा लग्न समारंभ त्यांनी अनेकांना दिले झाडाचे रोप.

 

अकाली वैधत्व आलेल्या स्त्रियांना अनेक सण- उत्सवात सहभागी होता येत नाही. पण अशा स्त्रियांच्या हस्ते त्यांच्या पतीच्या स्मृती जतन करण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशीच वडाची व इतर प्राणवायु देणारी झाडांची रोपे लावण्यात आली व ती जगविण्यातही आली.

गावातील निराधार महिला व अकाली वैधत्व आलेल्या महिलांना उत्पनाचे साधन म्हणून दुसर्‍या वर्षी वटपौर्णिमेला प्रत्येक महिलेला ५ शेवग्याची रोपे या प्रमाणे २५० रोपांचे वाटप जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड. वर्षाताई देशपांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 

संक्रातीला लुटूया वाण, शाळेला देवू पुस्तक दान…

या अभिनव उपक्रमाद्वारे महिलांच्या माध्यमातून १० हजाराहून अधिक किमतीची पुस्तके जि.प.प्राथमिक शाळेला दान देण्यात आली.
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. त्या निसर्गाशी आपल्याला जोडून घेता आले पाहिजे. आयुष्यभर आपणास प्राणवायु देणार्‍या झाडांना रक्षाबंधन दिवशी जवळवाडी गावातील महिला राख्या बांधून अतुट नाते जोपासण्याचा प्रयत्नही करीत असतात. जवळवाडी गावात प्रवेश करताच अभिनव पध्दतीने, लोकवर्गणीतून केलेली दुतर्फा वृक्षलागवड सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

 

(वर्षा विलास जवळ या सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील जवळवाडीच्या सरपंच आहेत. विलासबाबा जवळ हे त्या परिसरातील सामाजिक कार्यात सहभागी असतात.)


Tags: varsha vilas javalvilas javalवर्षा विलास जवळविलास जवळसंतवीर बंडातात्या कराडकर
Previous Post

“निसर्गाची जपणूक करून विकास कामे करण्याबाबत तांत्रिक सल्ला देणारी संस्था स्थापन करावी” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

मंगळावर नासाला सापडला मीठ असण्याची शक्यता दर्शवणारा पुरावा….

Next Post
NASA

मंगळावर नासाला सापडला मीठ असण्याची शक्यता दर्शवणारा पुरावा....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!