मुक्तपीठ टीम
भारतासमोर कोरोनाचं संकंट उभ ठाकलेलं असताना आता थायी सुनेनं भारताकडे मदतीचा हात पुढे केला आहे. ही थायी सुन आहे थायलंडमधील प्रसिद्ध उद्योजिका रोजाना व्हॅनिच कांबळे. रोजाना या उद्योग खात्याचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या पत्नी आहेत. रोजाना यांनी आपल्या मित्र परिवाराच्या मदतीने भारताला व्हेंटिलेटर आणि २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत केली आहे.
पूज्य भन्ते जयासारो तथा त्यांचे उपासक आणि रोजाना व्हॅनिच कांबळे या बौद्ध धर्मक्षेत्रांना वैद्यकीय मदत करणार आहेत. बोधगया, राजगीर, नालंदा, सारनाथ, कुशीनगर, श्रावस्ती, नागपूर, औरंगाबाद येथील विहार आणि रुग्णालयांना २० ते २५ रुग्णवाहिका दान देण्यात येणार आहेत. या मदत कार्यात त्यांचे पती डॉ. हर्षदीप कांबळे यांनीही हातभार लावला आहे. या दाम्पत्यांने संकट काळात गरजूंना मदत करत एक आदर्श ठेवला आहे.
थायी सुनेची सासरीही सामाजिक बांधिलकी…
• रोजाना व्हॅनीच कांबळे यांनी पहिल्यांदाच अशी मदत केलेली नसून याआधीही त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील बुद्धिस्ट भिक्खू ट्रेनींग सेंटर उभारण्यासाठी मोठी मदत दिली होती.
• त्यांच्या मदतीने औरंगाबाद येथील चौका येथे लोकुत्तरा महाविकार आणि भिक्खू ट्रेनिंग सेंटर उभारण्यात आले आहे.
• रोजाना व्हॅनिच कांबळे आणि डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आपण समाजाला काही तरी देणे लागतो या भावनेने आपल्या गरजा कमी केल्या आहेत.
• समाजातील गरीब होतकरु व गरजवंत मुलामुलींच्या संगोपनासाठी ‘स्वत:चं मुल नको’ असा मोठा निर्णय त्यांनी गेल्या वर्षी घेतला आहे.