मुक्तपीठ टीम
बजाज ऑटोने देशातील सर्व मॉडेल्सच्या विनामूल्य सेवा कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढविला आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे बजाज ऑटोने हा निर्णय घेतला. १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान संपणारा विनाशुल्क सेवा कालावधी आता ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. वाढवलेला विनामूल्य सेवा कालावधी सर्व दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांना लागू आहे.
बजाज ऑटोची विनामूल्य सर्व्हिसला मुदतवाढ
• देशातील सर्व मॉडेल्सच्या विनामूल्य सर्व्हिस कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढविला आहे.
• कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे बजाज ऑटोने हा निर्णय घेतला.
• १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान संपणाऱ्या वाहनांसाठी मोफत सेवा कालावधी आता ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे.
• वाढलेली विनामूल्य सेवा कालावधी सर्व दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांना लागू आहे.
• बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा म्हणाले की, “मागील वर्षाप्रमाणेच आम्ही पुन्हा आमच्या सर्व ग्राहकांसाठी सेवा कालावधी दोन महिन्यांपर्यंत वाढवित आहोत.”
पाहा व्हिडीओ: