Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अनुष्काचा विराट उपक्रम, गर्भवतींसाठी हेल्पलाइनचाही प्रचार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Anushka sharma

मुक्तपीठ टीम

 

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनं कोरोना संकटातील गरजूंच्या मदतीसाठी काम चालवले आहे. दोघांनी मिळून स्वत:चे पैसे तर दिलेच, पण क्राउडफंडिंगच्या माध्यमातून ११ कोटी रुपयांचा निधीही उभारला. ते तेवढ्यावरच थांबलेले नाहीत. आता अनुष्का एका वेगळ्या कामात गुंतली आहे. कोरोना संकटात गरोदर असणाऱ्या महिलांना खूप अडचणी येत असतात. ते ओळखून अनुष्काने त्यांना आवश्यकता भासली तर मदत मिळेल अशी माहिती शेअर केली आहे. नुकतीच तिने कोरोना काळात गरोदर महिलांना २४ तास मदत देणारा एक हेल्पलाइन नंबर पोस्ट केला आहे. महिला आयोगाच्या हेल्प टू हेल्प हेल्पलाइन नंबरसह ईमेल आयडीदेखील शेअर केला आहे. हेल्पलाईनचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर ९३५४९५४२२४ आहे, तर ईमेल आयडी helpatncw@gmail.com आहे. या सेवेप्रमाणेच अनुष्काचे वर्णनही हॅप्पी टू हेल्प असेच करावे लागेल.

 

हॅप्पी टू हेल्प

अनुष्का शर्माने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सांगितले आहे की, राष्ट्रीय महिला आयोगाने ‘हॅप्पी टू हेल्प’ उपक्रमांतर्गत गर्भवती आणि नुकत्याच आई बनलेल्या महिलांना वैद्यकीय मदत देण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे. वैद्यकीय मदत देण्यासाठी एनसीडब्ल्यू टीम २४ तास उपलब्ध असेल.

 

ईमेल आयडी-व्हॉट्सअ‍ॅप नंबर

अनुष्काने हेल्पलाइन नंबरसह ईमेल आयडीदेखील शेअर केला आहे. हेल्पलाईनचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर ९३५४९५४२२४ आहे, तर ईमेल आयडी helpatncw@gmail.com आहे.

 

अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्याच्या या कोरोना संकट काळात समाजकार्याच्या प्रयत्नात आहे. अलीकडेच अनुष्का आणि तिचा पती क्रिकेटपटू विराट कोहली या दोघांनी कोरोना रिलीफसाठी क्राउडफंडिंगच्या माध्यमातून अकरा कोटी निधी गोळा केला. त्यांनी स्वत:ही २ कोटींची मदत केली. या व्यतिरिक्त आता तिने गर्भवती व नुकत्याच आई बनलेल्या महिलांच्या मदतीसाठी माहितीही पुरवण्यास सुरुवात केली आहे.

 

अनुष्काने तिचा पती भारतीय कर्णधार विराट कोहलीसोबत कोरोना रिलीफसाठी ११ कोटींचा निधी जमा केला आहे. अनुष्काने मदतीच्या आवाहनाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करुन याची सुरूवात केली होती.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: anushka sharmahelpline numberpregnant womanvirat kohaliअभिनेत्री अनुष्का शर्माइन्स्टाग्राम हँडलविराट कोहली
Previous Post

ज्ञानाच्या बळावर तरुणीची झेप, मायक्रोसॉफ्टचे २ कोटीचं पॅकेज

Next Post

टाटा, हिरोनंतर बजाजनेही वाढवली विनामूल्य सर्व्हिसची मुदत

Next Post
Bajaj

टाटा, हिरोनंतर बजाजनेही वाढवली विनामूल्य सर्व्हिसची मुदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!