मुक्तपीठ टीम
तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायत दारांचे मोठं नुकसान झालंय. ऐन काढणीच्या हंगामातच आंबा गळून पडला असून बागांमध्ये आंब्याचा अक्षरशः आंब्याचा सडा पडलाय . मागीलवर्षी निसर्ग चक्रीवादळात झाडे पडली होती त्यामुळे यंदा पीक कमी होते. ते देखील निसर्गाच्या दुष्टचक्रात बुडाले . लागोपाठच्या संकटांनी बागायतदार हवालदिल झालाय. यावर पाहूया स्पेशल रिपोर्ट ….
रत्नागिरी जिल्हयात सरासरी मे महिन्यात आंबा काढणी सुरू होते गेल्यावर्षी बागाच उध्वस्त झाल्या मात्र यावर्षी तसे पीक बऱ्यापैकी आले होते त्यामुळे बागायतदार समाधानी होता चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील जयंत शिंदे यांच्या सहा एकर आंब्याच्या बागेत १०० झाडे आहेत दरवर्षी पन्नास हजार आंब्याचे पीक येते तसे याहीवर्षी आंब्याचे पीक आले होते आणि पिकाची काढणी सुरू होती आता कुठे तरी आंब्याला चांगला दर मिळेल अशी त्यांना आशा होती
जयंत शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या पिकाना तोक्त चक्रीवादळ यांनी झोडून काढले त्यामुळे शिंदे यांच्या बागेतील २० कलमाची झाडे जमीन दोस्त झाली तर आंबा गळून पडला त्यामुळे लाख रुपये नुकसान झाले आहे त्यातच सुरू झालेल्या अवकाळी पावसाने उभ्या पिकावर नांगर फिरवला. त्यामुळे सरकारने भरघोस मदत द्यावी अशी मागणी बागायदार करत आहेत पण आता सरकार नेमके काय करणार ? आंबा बागायदार यांना किती भरपाई देणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
जयंत शिंदे हे चिपळूनचे रहिवासी आहेत, त्यांनी सांगितले की, आज जवळजळ दोन दिवस चक्रीवादळ देशात, कोकणात घोंगावत आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कारण आमची ५० एकरवर असणारी ८, १० झाडं जमिनदोस्त झाली. झाडं गेलीच पण झाडावर असणारा आंबा जो विक्रीसाठी होता तो संपूर्ण गळून गेला आणि जवळजवळ लाखो रुपयांच नुकसान झालं. आमची उपजिवीकाचं यावर असल्याने आमचा सारखा शेतकरी पुन्हा कसा उभा राहणार. आम्हाला शासनाने भरघोस मदत केली पाहिजे.गेल्या वर्षीही वादळ आलं यावर्षी ही आलं त्यात लॉकडाऊन यामुळे माल बाजारात जात नाही आहे. म्हणून शेतकरी हवालदिल झाला आहे.