मुक्तपीठ टीम
अति तिथं माती अशी म्हणणं आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे, ती काही उगाच नाही. औषधही प्रमाणाबाहेर घेतलं तर बाधू शकतं. त्यामुळेच आता कोरोना संकट काळात जो मिळेल तो सल्ला मानताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. अगदी मग तो उठसुट मिळणारा व्हिटॅमिन सी सप्लिमेंट घेण्याच्या सल्ला असला तरीही काळजी घेतलीच पाहिजे.
संसर्ग झाला तर शरीर सक्षम असावं यासाठी सध्या आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याकडे जोर दिला जातो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार असो वा घरगुती उपाय करताना दिसत आहेत. तसेच बरेच जण रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सीच्या औषधांचे सेवन करीत आहे. पण हे ही समजून घेणे गरजेचे आहे की, व्हिटॅमिन सी आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी त्याचे जास्त प्रमाणात सेवन हे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. त्यामुळे व्हिटॅमिन सीच्या सेवनाचे दुष्परिणामाबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.
‘व्हिटॅमिन सी’ अतीही नाही चांगलं…
• व्हिटॅमिन सीच्या गोळांच्या सेवनाने मळमळ होते किंवा अस्वस्थ वाटू लागते.
• त्यामुळे व्हिटॅमिन सी औषधांच्या सेवनापेक्षा व्हिटॅमिन सी असणारे फळे खाल्ले पाहिजेत.
• रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या व्हिटॅमिन सी गोळ्यांच्या अति सेवनांने निद्रानाश किंवा डोके दुखीची समस्या उद्भवू शकते, त्यामुळे अति सेवन टाळा.
• अति प्रमाणात व्हिटॅमिन सीचे सेवन केल्यास ओटीपोटात वेदना होतात, तसेच पचन क्रियेवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात खाऊ नका.
• व्हिटॅमिन सीच्या अती सेवनाने छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. असे झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
• सर्वात महत्वाचं, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्हिटॅमिन सीच्या गोळ्या किंवा औषधांचे सेवन करा.