मुक्तपीठ टीम
नाशिक मनपा रुग्णालयाच्या बिटको रुग्णालयात शनिवारी भाजपा नगसेवक सीमा ताजने यांचा पती राजेंद्र ताजने धुडगूस घातला होता. कोरोनासेंटरमध्ये गाडी घुसवून रुग्णांच्या आणि डॉक्टरांच्याही जीवाला धोका निर्माण करणाऱ्या मस्तवाल राजेंद्र ताजणेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याआधीही त्याने असे केल्याचे म्हटले जाते. तरीही या मस्तावालाला कोण वाचवत आहे, असा प्रश्न नाशिकमध्ये विचारला जात आहे.
शनिवारी नगरसेविका सीमा ताजने यांचे पती राजेंद्र ताजने नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात कार घुसवली. कोचेचा दरवाजा फुटल्याने रुग्णालयाच्या आत सर्वत्र काचा पसरल्या. रुग्णालयातील ऑक्सिजन सिलेंडर आणि स्ट्रेचरची तोडफोड झाली आहे. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांनी शिवीगाळही केली असून, नगरसेविकेच्या पतीनं रुग्णालयाचं नुकसान का केलं, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. संबंधित घटेनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच रुग्णालय प्रशासनाकडून यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे.
नाशिक मनपाचे बिटको रुग्णालय हे सध्या कोरोना केअर रुग्णालय आहे. सुमारे ९०० रुग्ण उपचार इथे घेत आहेत. राजेंद्र ताजणे यांनी केलेल्या या कृत्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ताजणे याने तेथील कर्मचाऱ्यांवर सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकनेही हल्ला केला. त्यामुळे तेही दहशतीत आहेत. राजकीय गुंडांवर कारवाई का नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
राजेंद्र ताजणेची कोरोना सेंटरमधील मस्तवाल गुंडगिरी
- शनिवारी संध्याकाळी कोरोना उपचार केंद्रात ही घटना घडली.
- या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे, त्यामुळे प्रकरण दाबणे अवघड झाले आहे.
- रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील काचा फोडून इनोव्हा गाडी राजेंद्र ताजने यांनी रुग्णालयात घुसवली.
- राजेंद्र ताजणेने वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर पेव्हर ब्लॉकनेही हल्ला चढवला, त्यामुळे त्याला गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने जे झाले ते अपघाती असा दावाही करता येणार नाही.
- काही दिवसांपूर्वी राजेंद्र ताजने यांच्या वडिलांचं नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयात निधन झालं होतं. पण त्याला २० दिवस उलटले आहेत, त्यामुळे तो राग म्हणता येत नाही.
- स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांच्यामते राजेंद्र ताजणे यांना नगरसेविका असूनही रेमडेसिव्हिर वगैरेत प्राधान्य मिळत नाही, त्यामुळे लोकांना पुरवता येत नाही, असाही राग होता.
- अद्याप त्याला अटक झालेली नसल्यामुळे या कृत्यामागील कारण स्पष्ट झालेलं नाही.