मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि छत्तीसगडमध्ये कोरोनाचा फैलाव हा कमी झालेला दिसून येत आहे. या राज्यामध्ये कोरोनानं शिखर गाठून झाले आहे. कोरोना संसर्गाचा कल आता उताराकडे आहे. संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये अद्याप कोरोना संसर्गानं शिखर गाठलेले नाही. त्यामुळेच आताही देशानं काळजी घेणे गरजेचे आहे.
देशात सर्वाधिक धोका असलेली राज्यं
• केरळ
• बिहार
• झारखंड
• राजस्थान
• हरियाणा
• तेलंगणा
या सहा राज्यांमध्ये कोरोना संसर्ग स्थिर पातळीवरही नाही. तेथे तो कमी जास्त होत आहे. आयआयटीचे वरिष्ठ वैज्ञानिक प्रो. महेंद्रकुमार वर्मा आणि प्रा. राजेश रंजन यांनी ‘द सस्पिटेबल इंफेक्टेड रेसिसटेंट’ नावाचे मॉडेल तयार केले आहे. याआधारावर कोरोना संसर्ग वाढणे किंवा कमी होण्याचे आकलन केले जाते.
कोरोना संसर्ग वाढतो की घटतो हे ओळखण्याचे मॉडेल
आयआयटीचे प्रा महेंद्र कुमार वर्मा यांनी कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेच्या दररोजच्या रुग्णसंख्येच्या आधारावर एसएआर ‘सस्पेसिस इन्फेक्टेड रेसिस्टंट’ मॉडेल बनवले आहे. त्याच्या आधारे, रुग्णांची संख्या वाढणे आणि घटणे याचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्यांनी प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र अहवाल तयार केला आहे. प्रो. वर्मा यांनी टीपीआर (१०० चाचण्यांवरील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या) आणि सीएफआर (एकंदर रुग्णसंख्येतील मृत्यूची टक्केवारी) यांचेही आपल्या अहवालात मूल्यांकन केले आहे. अहवालानुसार टीपीआर आणि सीएफआर दोन्ही दिल्लीत जास्त आहेत. आठ मे रोजी त्यांनी आरोग्य मंत्रालयाला हा अहवाल पाठवला आहे.
या राज्यात संसर्गाचा कल आता उताराकडे
राज्य | टीपीआर | सीएफआर |
महाराष्ट्र | २१ | १.५३ |
उत्तर प्रदेश | १२ | १.२२ |
मध्य प्रदेश | १८ | ०.६६ |
गुजरात | ९ | १.०० |
छत्तीसगड | २३ | १.६१ |
दिल्ली | २५ | १.६५ |
या राज्यांमध्ये चढ-उतार
राज्य | टीपीआर | सीएफआर |
केरळ | २७ | ०.१४ |
झारखंड | ११ | २.२२ |
बिहार | १४ | ०.४९ |
राजस्थान | २० | ०.९१ |
हरियाणा | २८ | १.१७ |
तेलंगणा | ९ | ०.८० |
या राज्यांनी अद्याप संसर्गाचा शिखर गाठलेला नाही-
राज्य | टीपीआर | सीएफआर |
कर्नाटक | ३१ | ०.८२ |
आंध्रप्रदेश | १९ | ०.३८ |
तामिळनाडू | १६ | ०.७६ |