Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रासह दिल्ली, यूपीत कोरोना घटतोय, काही राज्यांमध्ये मात्र परिस्थिती गंभीरच

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Corona

मुक्तपीठ टीम

 

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि छत्तीसगडमध्ये कोरोनाचा फैलाव हा कमी झालेला दिसून येत आहे. या राज्यामध्ये कोरोनानं शिखर गाठून झाले आहे. कोरोना संसर्गाचा कल आता उताराकडे आहे. संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये अद्याप कोरोना संसर्गानं शिखर गाठलेले नाही. त्यामुळेच आताही देशानं काळजी घेणे गरजेचे आहे.

 

देशात सर्वाधिक धोका असलेली राज्यं

• केरळ
• बिहार
• झारखंड
• राजस्थान
• हरियाणा
• तेलंगणा
या सहा राज्यांमध्ये कोरोना संसर्ग स्थिर पातळीवरही नाही. तेथे तो कमी जास्त होत आहे. आयआयटीचे वरिष्ठ वैज्ञानिक प्रो. महेंद्रकुमार वर्मा आणि प्रा. राजेश रंजन यांनी ‘द सस्पिटेबल इंफेक्टेड रेसिसटेंट’ नावाचे मॉडेल तयार केले आहे. याआधारावर कोरोना संसर्ग वाढणे किंवा कमी होण्याचे आकलन केले जाते.

 

कोरोना संसर्ग वाढतो की घटतो हे ओळखण्याचे मॉडेल

आयआयटीचे प्रा महेंद्र कुमार वर्मा यांनी कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेच्या दररोजच्या रुग्णसंख्येच्या आधारावर एसएआर ‘सस्पेसिस इन्फेक्टेड रेसिस्टंट’ मॉडेल बनवले आहे. त्याच्या आधारे, रुग्णांची संख्या वाढणे आणि घटणे याचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्यांनी प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र अहवाल तयार केला आहे. प्रो. वर्मा यांनी टीपीआर (१०० चाचण्यांवरील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या) आणि सीएफआर (एकंदर रुग्णसंख्येतील मृत्यूची टक्केवारी) यांचेही आपल्या अहवालात मूल्यांकन केले आहे. अहवालानुसार टीपीआर आणि सीएफआर दोन्ही दिल्लीत जास्त आहेत. आठ मे रोजी त्यांनी आरोग्य मंत्रालयाला हा अहवाल पाठवला आहे.

 

या राज्यात संसर्गाचा कल आता उताराकडे

राज्य टीपीआर सीएफआर
महाराष्ट्र २१ १.५३
उत्तर प्रदेश १२ १.२२
मध्य प्रदेश १८ ०.६६
गुजरात ९ १.००
छत्तीसगड २३ १.६१
दिल्ली २५ १.६५

 

या राज्यांमध्ये चढ-उतार

राज्य टीपीआर सीएफआर
केरळ २७ ०.१४
झारखंड ११ २.२२
बिहार १४ ०.४९
राजस्थान २० ०.९१
हरियाणा २८ १.१७
तेलंगणा ९ ०.८०

 

या राज्यांनी अद्याप संसर्गाचा शिखर गाठलेला नाही-

राज्य टीपीआर सीएफआर
कर्नाटक ३१ ०.८२
आंध्रप्रदेश १९ ०.३८
तामिळनाडू १६ ०.७६

Tags: Corona VirusdelhiMaharashtraआरोग्य मंत्रालयमहेंद्र कुमार वर्मासस्पेसिस इन्फेक्टेड रेसिस्टंट’ मॉडेल
Previous Post

अमेरिकेत ज्यांनी घेतले लसींचे दोन्ही डोस, ते झाले ‘मास्क’मुक्त!

Next Post

“१०२ व्या घटना दुरुस्ती सोबतच ५० टक्के आरक्षण मर्यादेलाही आव्हान द्या!”

Next Post
ashok

"१०२ व्या घटना दुरुस्ती सोबतच ५० टक्के आरक्षण मर्यादेलाही आव्हान द्या!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!