Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पाच शुक्रवारी संध्याकाळी लावा आपल्या घरात एक दिवा” – डॉ. गणेश देवी

#FridayFlameAgainstCovid कोरोना साथीत बळी पडलेल्यांसाठी राष्ट्र सेवा दलाचे आवाहन

May 6, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
ganesh devy

मुक्तपीठ टीम

 

करोना विषाणू रोग संसर्गाला बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्याकरता राष्ट्र सेवा दलातर्फे शुक्रवार, ७ मे २०२१ पासून पुढील पाच शुक्रवार ऑनलाईन श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोना महामारी म्हणजे भारताच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात उद्ध्वस्तकारक आपत्ती आहे. आजपर्यंत या विषाणू संसर्गाने जवळजवळ दोन कोटी नागरिकांना बाधित केले आहे. तर दरदिवशी सुमारे चार लाख नवे संसर्गित रुग्ण आढळत आहेत.

 

मे महिन्याच्या मध्यापर्यंत अशा नव्या बाधित रुग्णांची रोजची संख्या सात आठ लाखांपर्यंत वाढण्याची भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या कोरोना साथीची दुसरी लाट सुरू आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भविष्यात भारतात या साथीची तिसरी लाट भारतात येण्याची शक्यता आहे. आपण या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचारही केलेला नाही.
आधुनिक भारताच्या इतिहासात आजपर्यंत आलेल्या अन्य कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीत बळी पडलेल्या नागरिकांच्या संख्येपेक्षा या साथीत बळी पडलेल्या नागरिकांची संख्या खूप अधिक आहे. प्रश्न आहे आपण एक समाज म्हणून या राक्षसी संकटाला कसे तोंड देणार आहोत? याचा एक मार्ग म्हणजे देशाची आरोग्य व्यवस्था बळकट करणे आणि त्याला मानवी संसाधनांची जोड देणे. कोरोना लस उत्पादन आणि ऑक्सिजन उत्पादनाला गती देणे.

 

कोरोना संसर्गाच्या फटक्याने आजपर्यंत देशातील कोट्यावधी कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. या कुटुंबानी आपली जवळच्या प्रिय व्यक्ती गमावल्या आहेत,आपली उपजिविकेची साधने गमावली आहेत, जगण्याची उमेदच गमावली आहे. कोरोना हे एक व्यक्तिगत संकट नाही. ते एक अभूतपूर्व सार्वत्रिक असे जागतिक संकट आहे. या संकट समयी आपण साथीत विविध प्रकारे बळी ठरलेल्या नागरिकांचे स्मरण करुन त्यांना आपली आदरांजली अर्पण करू. पण त्याच बरोबर द्वेष, आणि अन्याय सहन करत विविध संघर्ष करताना बलिदान करणाऱ्या सर्व धैर्यवान भारतीयांना केलेला तो मानाचा मुजरा असावा.

 

राष्ट्र सेवा दलातर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात कोरोना संसर्गीत रुग्णांना विविध प्रकारे अमूल्य असे साहाय्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्र सेवा दला तर्फे कोरोना साथीला बळी पडलेल्यांचे स्मरण करण्यासाठी ऑनलाइन श्रद्धांजली व निर्धार सभांचे आयोजन केले जात आहे. यात आपल्याला सोडून गेलेल्यांच्या स्मरणार्थ दोन ते तीन मिनीटांची छोटी भाषणे होतील.

 

पाच शुक्रवार ऑनलाईन श्रद्धांजली सभा

• पहिला शुक्रवार  ७ मे, रोजी संध्याकाळी ६ वाजता होणाऱ्या या ऑनलाईन सभेत देशातील मान्यवर विचारवंत, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार सहभागी होतील.
• दुसरा शुक्रवार १४ मे, रोजी संध्याकाळी ६ वाजता देशभरातील कोरोनात बळी गेलेल्या जवळपास ५०० (महाराष्ट्रात १२४) पत्रकारांना अभिवादन आणि एकजूट. सहभाग देशातील मान्यवर पत्रकार.
• तिसरा शुक्रवार २१ मे, रोजी संध्याकाळी ६ वाजता कोरोनात बळी गेलेल्या देशातील फ्रंट लाईन वर्कर्स, डॉक्टर्स, नर्सेस, आशाताई, शिक्षक, कामगार यांच्या बलिदानाला अभिवादन आणि त्यांच्या लढाईला पाठिंबा.
• चौथा शुक्रवार २८ मे, रोजी संध्याकाळी ६ वाजता कोरोना विरोधात लढणाऱ्या देशभरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा निर्धार.
• पाचवा शुक्रवार,४ जून, रोजी एक दिवसाचा उपवास.
धैर्य, एकजूट, आशा आणि स्वातंत्र्य, समता या मूल्यांशी आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी यात सहभागी व्हा.


Tags: coronadr ganesh devyMaharashtraऑनलाइन श्रद्धांजलीडॉ गणेश देवीमहाराष्ट्रराष्ट्र सेवा दल
Previous Post

#मुक्तपीठ गुरुवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Next Post

सावधान! डॉक्टरांना न विचारता कोरोनासाठी औषध घेऊ नका! एकाच कुटुंबात ८ मृत्यू, ५ अत्यवस्थ !!

Next Post
suspicious medicine

सावधान! डॉक्टरांना न विचारता कोरोनासाठी औषध घेऊ नका! एकाच कुटुंबात ८ मृत्यू, ५ अत्यवस्थ !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!