Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! डॉक्टरांना न विचारता कोरोनासाठी औषध घेऊ नका! एकाच कुटुंबात ८ मृत्यू, ५ अत्यवस्थ !!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
suspicious medicine

मुक्तपीठ टीम

 

छत्तीसगड राज्यातील बिलासपूरमध्ये एकाच कुटुंबातील सातजणांचा मृत्यू झाला आहे. त्याच कुटुंबातील पाचजणांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्या कुटुंबाने डॉक्टरांशी न बोलताच कुणीतरी सुचवलेले औषध घेतले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांच्या तपासात मृत्यूमागील इतर शक्यताही पडताळून पाहिल्या जातील.

 

एकाच कुटुंबातील सातजणांचे बळी आणि पाच अत्यवस्थ असण्याची ही घटना बिलासपूरच्या सिरगीट्टी पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. कोर्मी गावात कुटुंबातील सर्वांनीच औषध आणि मोहाची दारु घेतली होती. काही वेळातच प्रत्येकाची तब्येत ढासळण्यास सुरवात झाली आणि एकामागून एक सातजण मरण पावले. उरलेले पाचही अत्यवस्थ आहेत.

 

या गावातील तरुण खोकल्यावरील एक हमियोपॅथीचे औषध पित असत. त्यांना कुणीतरी सांगितलेले की ते औषध मोहाच्या दारुसोबत प्यालं की कोरोनापासून बचाव होतो. त्या गैरसमजातून गेले काही दिवस गावातील अनेकांमध्ये या वेगळ्या कॉकटेलची सवय वाढली होती. मंगळवारी रात्री कोरोनापासून बचावासाठी या कुटुंबातील बाराही जणांनी तेच मिश्रण प्याले असणार, अशी शक्यता आहे.

 

मृतांपैकी चौघांचे अंत्यसंस्कार रात्रीच्या वेळी करण्यात आले. त्यामुळे ही बाब संशयास्पद बनली आहे. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते जे औषध ते प्यायले त्यात अल्कोहोलचे प्रमाण खूपच जास्त असते, ते बाधले असणार, अशी शक्यता आहे.


Tags: suspicious medicineछत्तीसगडसिरगीट्टी पोलीस स्टेशन
Previous Post

“पाच शुक्रवारी संध्याकाळी लावा आपल्या घरात एक दिवा” – डॉ. गणेश देवी

Next Post

लसींच्या दोन्ही डोसांमध्येही महाराष्ट्र देशात प्रथम

Next Post
maharashtra

लसींच्या दोन्ही डोसांमध्येही महाराष्ट्र देशात प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!