मुक्तपीठ टीम
ठाणे रेल्वे स्थानकातील सार्वजनिक शौचालयात पीरियड रूमचे नुकतेच उद्घाटन झाले. स्त्रीयांना जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सार्वजनिक शौचालय असणाऱ्या ठिकाणी स्त्रीयांना होणाऱ्या मासिक पाळीच्या दिवसात स्वछता राखण्यासाठी एक आधुनिक कल्पना लढवली आहे. पाळीच्या आरोग्याच्या विषयावर बरीच चर्चा झाल्याने ठाणे महानगरपालिकेने ठाणे येथील सार्वजनिक शौचालयात पीरियड रूमचे अनावरण केले.
हा देशातील पहिलाच प्रकल्प असल्याचे म्हटले जाते. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांच्या उपस्थितीत नुकतेच या पीरियड रूमचे उद्घाटन करण्यात आले, स्थानिक नगरसेवक तसेच परिसरातील अन्य महिला या ठिकाणी उपस्थित होत्या.
पीरियड रूम असण्याची संकल्पना फार उपयुक्त आहे कारण, महिला झोपडपट्टी किंवा इतर ठिकाणी सार्वजनिक शौचालये वापरतात तेथे त्यांना या कालावधीत स्वछता राखणे अत्यंत अवघड जाते. महिलांच्या मासिक पाळीच्या स्वच्छतेचा अभ्यास करण्यासाठी फाउंडेशनने ठाणे येथे सर्वेक्षण केले. त्यांनी झोपडपट्ट्यांमधील १,००० महिलांना एकत्रित केले आणि मासिक पाळीच्या वेळी महिलांना व्यवस्थापन करणे किती कठीण होते याचा प्राथमिक निष्कर्ष यातून काढला.
फाउंडेशनच्या व्यवस्थापक नेहाली जैन म्हणतात, “आमच्या सर्वेक्षणात ठाणे येथील झोपडपट्टीतील ६७% पेक्षा जास्त महिलांकडे घरात शौचालये नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्या सार्वजनिक शौचालयांवर अवलंबून आहेत. शौचालयात पाण्याचे नळ नसल्याने त्यांना स्वच्छता राखणे कठीण जाते. महानगरपालिकेने सहमती दर्शविली आणि महिलांसाठी अशा संकल्पना अस्तित्वात आली.”
पाहा व्हिडीओ: