Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईच्या विकासासाठी जमिनीखाली पराक्रम गाजवणार ‘मावळा’

मुंबईच्या सागरी मार्गासाठीचे महाबोगदे वेगानं खोदणार

January 12, 2021
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Mavala TBM-1

मुक्तपीठ टीम

 

मुंबईच्या सागरी किनारा मार्गासाठी दोन महाबोगदे खणणारे ‘मावळा’ टीबीएम यंत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते सोमवारी कार्यान्वित करण्यात आले. या महायंत्राच्या महाक्षमतेचे मुख्यमंत्र्यांनी मोकळेपणाने कौतुक केले. मुंबईच्या विकासासाठी जमिनीखाली महापराक्रम गाजवणारे हे महायंत्र मावळा आहे तरी कसे ते समजून घेणं महत्वाचं आहे.

बोगदा खणणारे मावळा मशीन म्हणजेच टीबीएम हे या प्रकल्पातील महत्त्वाचे साधन आहे. त्याची माहिती देणारे प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत:

  • या टीबीएम मशीनला ‘मावळा’ असे नाव देण्यात आलं आहे.
  • हे अजस्त्र यंत्र 12 मीटर 19 इंच व्यासाचे आहे.
  • देशात आतापर्यंत वापरण्यात येणारे सर्वात मोठ्या व्यासाचे टीबीएम मशीन आहे.
  • तयार होणाऱ्या 11 मीटर बोगद्यात सर्व सुरक्षेची व्यवस्था असेल.
  • अरबी समुद्राखालील तब्बल 175 एकर जमिनीवर भराव टाकण्यात आला आहे.
  • अजून 102 एकर समुद्राखालील जमिनीवर भराव टाकण्यात येणार आहे.
  • या मार्गावर समुद्राखालून 400 मीटरचे बोगदे असतील.
  • हे बोगदे खोदण्याचे काम मावळा करणार आहे

 

महाबोगदे खणण्याची सुरुवात प्रियदर्शनी पार्क येथून करण्यात आली. हे बोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या ‘छोटा चौपाटी’पर्यंत असणार असून ते ‘मलबार हिल’ च्या खालून जाणार आहेत. दोन्ही बोगदे हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर असणार आहेत. दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.०७ किलोमीटर इतकी असणार आहे. भारतातील महानगरांमधील रस्ते बोगद्यांमध्ये अशा प्रकारची यंत्रणा भारतात पहिल्यांदाच बसविण्यात येणार आहे. सागरी किनारा मार्गाच्या एकूण कामापैकी २० टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. शामलदास गांधी मार्गावरील उड्डाणपूल (Princess street flyover) ते वरळी या दरम्यान १०.५८ किमी लांबीचा हा ‘सागरी किनारा मार्ग’ असेल.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: chief minister uddhav thackeraycm uddhav thackeraymavalamavala tbmmumbai coastal roadUddhav Thackerayउद्धव ठाकरेमावळामावळा टीबीएममुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई सागरी किनारा मार्ग
Previous Post

#चांगलीबातमी ठाणे स्थानकात पीरियड रुमचे उद्घाटन, स्त्रीयांसाठी पाळीच्या दिवसांसाठी सुविधा

Next Post

#चांगलीबातमी नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ भरती

Next Post
NFL -1

#चांगलीबातमी नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये 'मॅनेजमेंट ट्रेनी' भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!