मुक्तपीठ टीम
हरित पर्यावरणासाठी वृक्षारोपण हा एक महत्त्वाचा पाऊल असतं. अजय देवगन याने कतेचन वृक्षारोपण करण्यात सहभाग घेतला. त्यासाठी तो थेट तेलंगणात पोहचला. ग्रीन इंडिया चॅलेंजचा भाग म्हणून अनेक सेलिब्रिटींनी रोपट्यांची लागवड केली आहे. अभिनेता अजय देवगणही नुकतेच वृक्षारोपण केल्यामुळे त्या पर्यावरणप्रेमी बॉलिवुडचा भाग झाला आहे.
अलीकडच्या काळात अभिनेता अनेक सामाजिक उपक्रमांशी संबंधित आहे. हा सुपरस्टार त्याचा अभिनय, अक्शन, शांत वागणं यामुळे चाहत्यांना भावतो. आता पर्यावरणप्रेमी कार्यामुळे त्याच्याबद्दलची आपुलकी अधिकच वाढली आहे. त्याने ग्रीन इंडिया चॅलेंजचा भाग म्हणून नुकतेच वृक्षारोपण केले.
या प्रसंगी बोलताना अभिनेता अजय देवगण याने वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगितले. अधिकाधिक झाडे लावल्यास जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल वाढू शकेल असे तो म्हणाला. ग्रीन इंडिया चॅलेंजचा भाग होण्यासाठी मी उत्साहित असल्याचेही त्यांने सांगितले आणि ही साखळी सुरू ठेवण्यासाठी सर्वांना झाडे लावण्याचे आवाहन त्याने केले आहे.
अजय देवगण याने नंतर या उपक्रमाचे काही फोटो आणि व्हिडिओ ट्वीट केले आणि लिहिले “न्यूयॉर्क फाउंडेशन आणि मी ग्रीन इंडियासाठी कटिबद्ध आहोत. याआधी तेलंगणामध्ये वृक्षारोपण करण्याची संधी मला खासदार संतोष कुमार यांनी दिली होती. आज आपण जे पेरणार, त्याचा फायदा आपल्या पुढच्या पिढ्यांना नक्कीच होणार,” असेही ते म्हणाले..
पाहा व्हिडीओ: