मुक्तपीठ टीम
चीनने पृथ्वीवरील मानवजातीवर आणलेलं कोरोनाचं संकट टळलं नसतानाच एक नवं संकट तयार झालं आहे. अनियंत्रित झालेले एक महाकाय रॉकेट कधीही आणि कुठेही कोसळू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. अंतराळात घोंघावत असलेले हे नवे संकटही मेड इन चीनच आहे. चीनचे लाँग मार्च 5 बी हे महाकाय रॉकेट अवकाशात अनियंत्रित झाले आहे. प्रति सेकंद 4 मैलांच्या वेगाने ते पृथ्वीच्या दिशेने येत आहे. अंतराळात अनियंत्रित झालेले हे रॉकेट २१ टन वजनाचे आहे. चीनने गुरुवारी ५ मार्च रोजी रॉकेटचे प्रक्षेपण केले. त्यानंतर ते अनियंत्रित झाले. त्यातच ते पृथ्वीच्या दिशेने अतिवेगाने येत आहे. त्यामुळे ते पृथ्वीवर जिथे कोसळेल तिथे कोठेही विध्वंस आणू शकेल, अशी भीती आहे.
China’s space station is in orbit, but the rocket used to carry it may be making an uncontrolled re-entry. Parts of the rocket will burn up re-entering Earth’s atmosphere, but some say it’s impossible to predict where surviving debris will land. https://t.co/Ba5TeWYAeM
— ANUinSpace (@anuinspace) May 3, 2021
पृथ्वीवरच नाही तर अंतराळातही आपला प्रभाव वाढवण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या अंतराळात एकट्या अमेरिकेचे स्पेस स्टेशन म्हणजे अंतराळ स्थानक आहे. चीन अमेरिकेला अंतराळात टक्कर देण्यासाठी तीन अंतराळ स्थानकं उभारणार आहे. त्यासाठी आखलेल्या मोहिमेंतर्गत अंतराळ स्थानकाचे भाग घेऊन जाण्यासाठी चीन एकामागून अनेक रॉकेट्स प्रक्षेपित करत असतो. आता मात्र त्यापैकीच एका रॉकेटमुळे जगाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. न्यूयॉर्क, माद्रिद आणि बीजिंग सारख्या शहरांमध्ये या रॉकेटचे भाग कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चीनचे महाकाय रॉकेट, पृथ्वीला महाधोका
- चीनने ‘लाँग मार्च ५ बी’ रॉकेट त्यांच्या अवकाश मोहिमेंतर्गत गुरुवारी प्रक्षेपित केले.
- या रॉकेटने अंतराळ स्थानकाचे भाग नेण्यात आले.
- त्यानंतर ते रॉकेट नियंत्रणाबाहेर गेले.
- एका सॅटेलाइट ट्रॅकरला ते महाकाय चीनी रॉकेट सेकंदाला ४ मैल वेगाने पृथ्वीकडे जात आहे, असे आढळले. तेव्हा त्याने सावध केले.
- या गुरुवारीच चीनने या रॉकेटच्या सहाय्याने बांधण्यासाठी आपल्या अंतराळ स्थानकाचा पहिला भाग पाठविला होता.
- या मॉड्यूलचे नाव टियान आहे.
- रॉकेटचा हा मुख्य भाग १०० फूट लांब आणि १६ फूट रुंद आहे.
- तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चिनी रॉकेटचा मोठा भाग पृथ्वीच्या वातावरणात जळेल परंतु त्याचे बरेच अवशेष पृथ्वीवर कोठेही कोसळू शकतात.
- चीनमधील रॉकेट अवकाशात अनियंत्रित होण्याची ही पहिली वेळ नाही.
- आता अनियंत्रित झालेले रॉकेट न्यूयॉर्क, माद्रिद किंवा बीजिंग शहरात कोठेही कोसळू शकेल असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
- सुदैवाने या चीनी रॉकेटचा मार्ग हा भारताच्या बाहेरून जाणारा असल्याने सध्यातरी आपल्याला धोका नाही.
- त्याचवेळी तज्ज्ञांच्या मते असे अवशेष हे प्रामुख्याने महासागरांमध्ये कोसळतात.
- ४२ वर्षांपूर्वी अमेरिकेच्या स्कायलॅबमुळेही अशीच घबराट माजली होती.
The Long March 5B launcher was designed specifically for launching space station modules into low Earth orbit. It required China to develop new, cryogenic, high-thrust engines and wider diameter rockets — and a new spaceport to launch it. Video: CMSA pic.twitter.com/P366gD6qDt
— Andrew Jones (@AJ_FI) April 28, 2021
चीनच्या महारॉकेटचा कुठे आणि कसा धोका?
- तज्ज्ञांच्या मते, २१ टन वजनाची ही वस्तू चीनी ‘लाँग मार्च ५ बी’ रॉकेटचा मुख्य भाग आहे.
- गुरुवारी प्रक्षेपणानंतर हे रॉकेट समुद्रातील पूर्वनिर्धारित जागी पडण्याऐवजी पृथ्वीभोवती फेऱ्या मारु लागले.
- हे येत्या काही दिवसांत पृथ्वीवर पडेल असे सांगण्यात येत आहे.
- पृथ्वीच्या सभोतालच्या अवकाशावर, त्यातील वस्तूंवर नजर ठेवणारे खगोलशास्त्रज्ञ जोनाथन मॅकडॉवेल यांनी स्पेस न्यूजला दिलेल्या माहितीनुसार सांगितले की हे सॅटेलाइट सध्या न्यूयॉर्क, माद्रिद, बीजिंग वरून उत्तर व दक्षिणेस चिली व न्यूझीलंडकडे वळत आहे.
- ते म्हणाले की, हा चिनी रॉकेट या प्रदेशात कुठेही आपटू शकते.
- ते समुद्रात किंवा लोकसंख्या असलेल्या भागात पडू शकते. ते असेही म्हणाले की, पृथ्वीच्या जवळ येताच या चिनी रॉकेटचा मोठा भाग जळून खाक होईल.
【1080P 240帧】
长征五号B遥二起飞精彩瞬间:星河路虽远,我有中国箭!
使用华为Nova6手机拍摄。
(手机这个画质知足了,4km外要啥自行车) pic.twitter.com/hV32siRiJL— CHN-中国航天旅游 (@iBd6S77Ivw72xPk) May 1, 2021